Wednesday, June 19, 2024

अधिकारी आल्याने अनिवासी मुलांना रात्री उशिरापर्यंत ठेवले शाळेत

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी पाठ फिरवताच विद्यार्थी गेले आपापल्या घरी

मानोरा:- तालुक्यातील वाईगौळ येथील आश्रमशाळेच्या वसतीगृहात अनिवासी मुले निवासी दाखवुन संस्थाचालकांद्वारे शासनाची फसवणूक या मथळ्याचे वृत्त प्रकाशित होताच सहायक संचालक, इमाव बहुजन कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक यांनी चौकशीकरीता दि.८ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान आले होते. निवासी मुलांच्या जागेवर याच शाळेतील अनिवासी मुलांना रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवल्याने पालकांमध्ये तारांबळ उडाली होती. मुले रोज साडेपाच वाजताच घरी येत असतात परंतू त्यादिवशी न आल्याने पालकांनी शाळेच्या परिसरात गर्दी केली होती. परंतू त्या पालकांना धमकावून साहेब गेल्यावर तुम्ही मुलांना घेउन जा किंवा आम्ही घरी आणून सोडू, असे असे सांगितले गेल्याची दबक्या आवाजात माहिती आहे.
त्यारोजी मोघम स्वरूपाची चौकशी करून रात्री ८.५८ वाजता समाज कल्याण निरीक्षक श्री मयूर इप्पर हे परत जाताच शाळेतील कर्मचारी यांनी आपापल्या दुचाकीवर आणि भाड्याने ऑटो लावुन मुलांना घरी सोडल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यावरुन अनिवासी मुले निवासी दाखवुन शासनाची फसवणूक केले जात असल्याचे वृत्त खरे ठरले आहे.
आता इमाव बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा, प्रादेशिक आणि संचालनायातील स्तरावरील अधिकारी यांचे स्तरावरून कुठल्या प्रकारे कार्यवाही केल्या जाते, याची उत्सुकता तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील ह्या निवासी आश्रम शाळांमध्ये आपापल्या पाल्यांना शिक्षणासाठी दाखल केलेल्या पालकांना लागून आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news