Home bollywood अभिनेत्री दिशा पटाणीला भेटलाय नवीन बॉयफ्रेंड; कोण आहे हा नवा टायगर?

अभिनेत्री दिशा पटाणीला भेटलाय नवीन बॉयफ्रेंड; कोण आहे हा नवा टायगर?

0
अभिनेत्री दिशा पटाणीला भेटलाय नवीन बॉयफ्रेंड; कोण आहे हा नवा टायगर?

मुंबई : बॉलिवूडची सगळ्यात यंग आणि हॉट जोडी म्हणून टायगर आणि दिशा पटाणीकडे पाहयलं जायचं. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. अनेकदा हे कपल एकत्र वेकेशनवर जाताना दिसायचे तर कधी रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट व्हायचे. मात्र दोघांच्या ब्रेकअपने अनेकांना धक्का बसला. यानंतर टायगरच्या अफेअर्सच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या त्यांच्या ब्रेकअपला टायगरच जबाबदार असल्याचं बोललं जात होतं. 

तर आता दिशाच्याही आयुष्यात नवा टायगर आल्याचं बोललं जात आहे. होय खरं ऐकताय तुम्ही. नुकताच दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती त्याच्या कथित बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ रेस्टारंटच्या बाहेरचा असल्याचं दिसत आहे. यावेळी दिशाने पांढऱ्या रंगाचा क्राॉप टॉप आणि जीन्स परिधान केला आहे. तर तिच्या बॉयफ्रेंडने ब्लॅक कलरची बनियान घातली आहे. आणि लूज पँन्ट घातली आहे. हे कपल रेस्टारंटमधून बाहेर पडून कारकडे जात असल्याचं दिसत आहे. 

नुकताच हा व्हिडीओ विरल बयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत विरल भयानीने कॅप्शनमध्ये, ‘Couples day out ! Disha papped with her BF heading home after a snack’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. तर अनेकांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

एकाने कमेंट करत लिहीलंय, बॉयफ्रेंडवाला BF की, बेस्टफ्रेंडवाला BF? तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, दिशाच्या बॉयफ्रेंडच्या हातावर दिशाचा टॅटू कोणी नोटीस केला. तर अजून एकाने लिहीलंय की, कोण आहे हा मुलगा? अजून एकाने लिहीलंय, हिची जोडी टायगरसोबतच चांगली वाटते या मांजरासोबत नाही. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तर अनेकांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. सध्या दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर दिशाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेकजण तिच्या फिगरवर फिदा आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिचा चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते. मग तिचे बोल्ड फोटशूट असो, फिटनेस संबंधी व्हिडीओ असो किंवा तिची रिलेशनशिप स्टेटस अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ती सोशल मीडियावर वारंवार चर्चेचा विषय बनते. अलीकडेच, तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here