Home हेल्थ आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

0
आजचे राशिभविष्य:  जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (31 August 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

6 महिन्यांपूर्वी

  • कॉपी लिंक

गुरुवार 31 ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. गृहीणींना वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल.

मिथुन : शुभ रंग : लाल | अंक : १
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आर्थिक आवक पुरेशी असून आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. पाहुण्यांची उठबस कराल.

सिंह :शुभ रंग : निळा| अंक : २
नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल. विवाह विषयी बोलणी होकारार्थी पार पडतील.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. कायदा पाळावा.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : ५
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टाळा.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : २
अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची आज ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. व्यवसायात भिडस्तपणा नको.

धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटनांनी आत्मविश्वास वाढेल. कलाक्रिडा क्षेत्रात नवोदीतांना संधी मिळेल.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here