Sunday, June 23, 2024

आश्रमशाळेतील अनिवासी मुले निवासी दाखवून संस्थाचालकांकडून शासनाची फसवणूक

- Advertisement -

तक्रारीबाबत स्मरणपत्र देऊनही कार्यवाही होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने भ्रष्टाचार होत असल्याची चर्चेला वाव!

केवळ २०-२५ मुलांना जेवण

मानोरा:- तालुक्यातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था आणि ढेपाळलेल्या शैक्षणिक दर्जामुळे पालकांनी आता विजाभज आश्रमशाळाकडे पाठ केली असुन आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देत आहेत. असे होत असल्याने आश्रमशाळेतील वसतिगृहात निवासी विद्यार्थ्यांची वानवा भासते. अशावेळी संस्थाचालक मात्र आपली पोळी शेकण्याकरीता गावातील घरीच राहणाऱ्या डे- स्कॉलर विद्यार्थ्यांना हॉस्टेलर्स दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचे सर्रास सत्र सुरु आहे.
वाईगौळ येथे आसलेल्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतीगृहात केवळ २० ते २५ मुलेच निवासी असतात बाकी इतर सर्व मुले गावातील आहेत. त्यांची नावे वसतिगृह हजेरीपटावर दाखवून संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग राठोड, सचिव गोविंद पवार, कोषाध्यक्ष गोवर्धन जाधव आणि सदस्य महेंद्र अरोडा हे गत तीन वर्षापासुन अनुदान लाटत आल्याची तक्रार जिल्हा कार्यालयाकडे करूनही जिल्हा कार्यालयाने याकडे कानाडोळा करीत कुठ्ल्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर काल परत एका स्मरणपत्राद्वारे श्री. इंद्रजीत राठोड यांनी कार्यवाही करण्याबाबत कळविले असल्याने आता जिल्हा कार्यालयाचे अधिकारी कशाप्रकारे भूमिका बजावतात की पूर्वीप्रमाणेच संस्थासंचालक यांच्या भ्रष्टाचाराला मुकसंमती देतात याकडे आता सर्व जिल्हा वासियांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news