Home Blog काय सांगता? | देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर

काय सांगता? | देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर

0
काय सांगता? | देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर


देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर

लठ्ठपणा (Fat Body) ही समस्या अनेकांना सतावत असते. पण, ‘आयसीएमआर’ आणि ‘इंडियाबी’ या संस्थेने एक संशोधन केले होते. त्यामध्ये देशातील 40 टक्के लोकांना ढेरी असल्याचे समोर आले. तर या लठ्ठपणामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम आणि मेघालय या राज्यात हे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली : लठ्ठपणा (Fat Body) ही समस्या अनेकांना सतावत असते. पण, ‘आयसीएमआर’ आणि ‘इंडियाबी’ या संस्थेने एक संशोधन केले होते. त्यामध्ये देशातील 40 टक्के लोकांना ढेरी असल्याचे समोर आले. तर या लठ्ठपणामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम आणि मेघालय या राज्यात हे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर राज्यांमधील 25 टक्केपेक्षा जास्त लोक लठ्ठ आहेत.

‘आयसीएमआर’ आणि ‘इंडियाबी’ या संस्थेने ऑक्टोबर 2008 ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 वर्षे 31 राज्यांमधील एक लाख 13 हजार लोकांवर संशोधन केले होते. या संशोधनाचे हे निष्कर्ष आता समोर आले आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अहवालानुसार, देशातील 36 टक्के लोक उच्च रक्तदाब, 29 टक्के लठ्ठपणा, 11 टक्के लोक मधुमेह, 15 टक्के प्री-डायबेटिस, 40 टक्के सुटलेले पोट आणि 81 टक्के लोक वाढलेले कोलेस्टेरॉल यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत.

महाराष्ट्रात 25 टक्के

आसाम, बिहार, झारखंड आणि मेघालय या राज्यामध्ये 15 टक्क्यांपेक्षा कमी लोक लठ्ठ आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 15 ते 20 टक्के तर राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये 20 ते 25 टक्के लोक लठ्ठ असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीत 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोक लठ्ठ

पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि दिल्लीमध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोक लठ्ठ आहेत. तर राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोक उच्च कोलेस्टेरॉलने ग्रस्त आहेत.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here