Sunday, June 23, 2024

कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती सोयाबीनला कोणती खते दिली पाहिजेत?

- Advertisement -
Soybean Fertilizer Management

 : जर तुम्हीही सोयाबीन पेरणी करणार असाल किंवा सोयाबीनची पेरणी पूर्ण केलेली असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. सोयाबीन हे एक कॅश क्रॉप आहे. नगदी पीक असल्याने याची राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड पाहायला मिळते. या पिकापासून जरी शाश्वत उत्पादन मिळत असले तरी देखील शेतकऱ्यांना यातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, आज आपण सोयाबीन पिकासाठी कोणते खत वापरले पाहिजे त्याबाबत तज्ञ लोक काय सल्ला देत आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. तसेच सोयाबीन पीक व्यवस्थापना मधील इतरही महत्त्वाच्या बाबी आज आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोयाबीन पेरणी करताना कोणती खते द्यावीत?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीची पूर्व मशागत करताना शेणखत टाकले पाहिजे. शेणखताचा वापर केला तर या पिकातून चांगले उत्पादन मिळते. तसेच सोयाबीन पेरणी करताना एनपीके ही पोषक घटक देखील द्यावी लागतात. यामध्ये सोयाबीनची पेरणी करताना 50 किलो नत्र + 75 किलो स्फुरद + 45 किलो पालाश + 20 किलो गंधक प्रतिहेक्टरी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जर शेतकऱ्यांनी स्फुरद या घटकाची पूर्तता करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केला असेल तर अतिरिक्त गंधक देण्याची गरज नसते. पण जर गंधक रहित खतांचा वापर केला असेल म्हणजेच 18

18 10, 12 32 16 आणि 10 26 26 डीएपी या खतांचा वापर केला असेल तर प्रति हेक्टरी 20 किलो एवढे गंधक द्यावे लागणार आहे.

या बाबीची काळजी घ्या

सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बीजोपचार करणे गरजेचे आहे. रासायनिक खते शक्यतो पेरणीच्या वेळीच दिली पाहिजेत. पेरणीनंतर माती परीक्षणाच्या अहवालानुसारच रासायनिक खतांची मात्रा शेतकऱ्यांनी दिली पाहिजे. असंतुलित प्रमाणात खतांचा वापर केला तर पीक उत्पादनात घट येऊ शकते.

यासोबतच बियाणे पेरणी करताना बियाणे खतांच्या संपर्कात येणार नाहीत म्हणजेच बियाण्याला खताचा स्पर्श होणार नाही याची देखील काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यासोबतच सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनची वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोयाबीनची वेळेवर पेरणी 15 जुलै पूर्वीच केली जाते. यामुळे 15 जुलै नंतर शक्यतो सोयाबीन पेरणी टाळावी. अशा परिस्थितीत दुसऱ्या पिकांचा विचार शेतकरी करू शकतात.

पेरणीसाठी सोयाबीनचे चांगले बियाणे वापरावे. बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल तेच बियाणे पेरणीसाठी वापरले पाहिजे. पेरणी करताना 45 बाय पाच सेंटीमीटर किंवा 30 बाय 15 सेंटीमीटर अंतर राखले पाहिजे. बियाणे हे 3.5 ते 4.5 सेंटीमीटर पेक्षा खोल पेरू नये. अधिक खोल बियाणे पेरल्यास बियाण्याची उगवण होत नाही.

 

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news