गर्लफ्रेंडला मासिक पाळी येऊन ४० दिवस उलटले आहेत, हे चिंतेचं कारण आहे का?

0
20

प्रेयसी अनियमित मासिक पाळीच्या समस्येचा सामना करत आहे. कधीकधी तिला महिन्यातून तीन वेळा मासिक पाळी येते आणि आता मासिक पाळी येऊन ४० दिवस झाले आहेत. हे चिंतेचं कारण आहे का?

प्रश्न : माझी गर्लफ्रेंड अनियमित मासिक पाळीच्या समस्येचा सामना करत आहे. कधी-कधी तिला महिन्यातून तीन वेळा पीरियड्स येतात. आता मासिक पाळी येऊन ४० दिवस उलटले आहेत. हे चिंतेचं कारण आहे का?
उत्तर : हो, जर आपण कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेचा सामना करत असाल तर तुम्ही काळजी करायलाच हवी. जर आपण असुरक्षित संभोग केला असेल तर तिनं स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे.

अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर काय आहे उपाय?

मासिक पाळीमध्ये ६० ते ७० दिवस काही गडबड होत असेल तर यासाठी डॉक्टर हार्मोन्सशी संबंधित काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला देतात. फायब्रॉइड आणि सिस्टची समस्या आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पेल्विक अल्ट्रासाउंड केलं जातं. मेडिकल रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर हार्मोनल थेरपी, मासिक पाळी नियमित होण्यासाठी योग्य औषधोपचारांचा सल्ला देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here