Home Blog जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांत अभिनेत्री Slim And Trim! नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांत अभिनेत्री Slim And Trim! नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा

0
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांत अभिनेत्री Slim And Trim! नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा

Pankhuri Awasthy Transformation After Delivery : गरोदरपणात महिलांचं वजन (weight loss) झपाट्याने वाढतं. त्यामुळे हे वाढलेलं वजन डिलिव्हरीनंतर (weight loss after delivery) कमी करण्यासाठी महिला अतिशय मेहनत करतात. नुकताच एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांमध्ये वजन कमी करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.  (Transformation After Delivery) तिने फोटो शेअर करत नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांना प्रेरणा दिली आहे. (pankhuri awasthi shared her transformation pic flat belly after 27 days tips for weight loss after pregnancy in marathi)

नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा

अभिनेत्री पंखुरी अवस्थी हिने लग्नाच्या पाच वर्षानंतर 25 जुलै 2023 ला जुळ्या मुलांना जन्म दिला. तिच्या घरी कन्यारत्न आणि राजकुमाराचं आगमन झालं आहे. सध्या पंखुरी आणि तिचा नवरा गौतम रोडे नवजात मुलांसोबत पालकत्वाचे सुंदर क्षण जगत आहेत.  पण या सगळ्यातही पंखुरीने आपल्या वाढता वजन कमी करण्यावर लक्षकेंद्रीत केलं. 

 

 

A post shared by Pankhuri Awasthy Rode (@pankhuri313)

तिने सोशल मीडिया अकाऊंटवर Slim And Trim झालेला एक फोटो शेअर केला आहे. तिने फक्त 27 दिवसांमध्ये आपलं वजन कमी केलं आहे. या फोटोमध्ये ती काळ्या टी – शर्ट डेनिम स्कर्ट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये ती अतिशय क्यूट दिसतंय.

pankhuriawasthi

प्रसूतीनंतर वजन कसं कमी करायचं ?

प्रसूतीनंतर व्यायाम करणे आवश्यक आहे. तुम्ही घरच्या घरी योगा करुन वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. डिलिव्हरीनंतर पोट टोन करण्यासाठी व्याघ्रासन, भुजंगासन आणि उष्ट्रासन या योगाने तुम्हाला फायदा होईल. त्याशिवाय त्यांनी आहारावर लक्ष दिलं पाहिजे. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा, मासे आणि शेंगदाणे यांचं योग्यप्रमाणात आहारात समावेश केला पाहिजे. तर दुग्धजन्य पदार्थ आणि चिकन, मटन  यांचं सेवन कमी करावे. 

याशिवाय तुम्ही ग्रीन टी, कोमट पाण्यात मध, दालचिनीचं पाणी, मेथीच्या दाण्यांचं पाणी घेऊ शकता. त्याशिवाय कढीपत्ताचं पान किंवा कढीपत्त्याची पानं चावून खाल्ल्यास तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here