Home bollywood तमन्नाच्या ‘कवाला’ गाण्यावर पोरांचा भन्नाट डान्स; बॉयफ्रेंडलाही शेअर करण्याचा मोह आवरेना

तमन्नाच्या ‘कवाला’ गाण्यावर पोरांचा भन्नाट डान्स; बॉयफ्रेंडलाही शेअर करण्याचा मोह आवरेना

0
तमन्नाच्या ‘कवाला’ गाण्यावर पोरांचा भन्नाट डान्स; बॉयफ्रेंडलाही शेअर करण्याचा मोह आवरेना

रजनीकांत मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘जेलर’ चित्रपटात तमन्नावर (Tamannaah) चित्रित झालेलं ‘कवाला’ (Kaavaalaa) गाणं अद्यापही ट्रेंड होत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) अनेकजण या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यातच लहान मुलांच्या एका ग्रुपने केलेला भन्नाट डान्स व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ FC Barcelona ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतका गोड आहे की, तमन्नाचा प्रियकर विजय वर्माही तो शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलेला नाही. 

विजय वर्माने हा व्हिडीओ शेअर करताना तमन्नाचं कौतुक करत म्हटलं आहे, ‘जग आता तुझ्या तालावर नाचत आहे’. यानंतर त्याने “Fab stuff” असंही त्यात जोडलं. दरम्यान विजय वर्माने व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही मिनिटांनी तमन्नाने इन्स्टाग्रामला व्हिडीओ रिपोस्ट करत ‘हे फार कूल आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. 

FC Barcelona ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करताना “Their blaugrana energy” अशी कॅप्शन दिली आहे.  

तमन्ना आणि विजय वर्मा यांनी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये एकत्र काम केलं आहे. यादरम्यान त्यांचे सूत जुळले. तमन्ना आणि विजय वर्मा यांनी जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिली आहे. पण त्यांनी जाहीर करण्याआधीच त्यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. 

तमन्नाने Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत नात्यावर भाष्य करताना सांगितलं होतं की, “मला वाटत नाही की फक्त सहकारी आहे म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. मी अनेक अभिनेत्यांसह काम केलं आहे. मला वाटतं जेव्हा एखाद्याला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा ते जास्त वैयक्तिक आहे. यामध्ये ती व्यक्ती जगण्यासाठी काय करते याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो”.

कामाच्या बाबतीत बोलायचं गेल्यास, तमन्ना अलीकडेच रजनीकांतसह ‘जेलर’ चित्रपटात झळकली आहे. याशिवाय चिरंजीवीच्या ‘भोला शंकर’मध्ये देखील होती. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. याशिवाय अॅमेझॉनच्या ‘जी करदा’ आणि नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये देखील काम केलं आहे. 

तमन्ना बाहुबली, देवी, से रा नरसिम्हा रेड्डी यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते. अलीकडेची रिलीज झालेल्या तिच्या चित्रपटांमध्ये प्लॅन ए प्लॅन बी आणि बबली बाउन्सर यांचा समावेश आहे

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here