Home हेल्थ दररोजच्या Exercise ची भरपाई 1 दिवसात शक्य? हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी किती व्यायाम गरजेचा, मोठा खुलासा!

दररोजच्या Exercise ची भरपाई 1 दिवसात शक्य? हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी किती व्यायाम गरजेचा, मोठा खुलासा!

0
दररोजच्या Exercise ची भरपाई 1 दिवसात शक्य? हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी किती व्यायाम गरजेचा, मोठा खुलासा!

How Much Exercise Do Need for Heart Health : आजकाल अगदी बोटांवर मोजण्याइतकी लोकं असतील ज्यांची लाईफस्टाईल ( Lifestyle ) योग्य असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे ( Wrong Lifestyle ) आजकाल अनेक आजार बळावू लागलेत. यामधील एक प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे हृदयासंबंधीचे आजार. आपलं हृदय मजबूत ( Heart Health ) राहावं म्हणून आपण जीम किंवा एक्सरसाईज ( Exercise ) करण्यावर भर देतो.

मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक्सरसाईजसाठी ( Exercise ) वेळ मिळतो, असं नाही. यावर उपाय म्हणून काही जणं सुट्टीच्या दिवशी म्हणजेच विकेंडला संपूर्ण आठवड्याचा व्यायाम करतात. परंतु असं करणं किती योग्य? जर तुम्हाला हृदयाच्या आजारांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला किती एक्सरसाईजची ( Exercise ) गरज आहे? संपूर्ण आठवड्याचा व्यायाम एका दिवसात केल्याने हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते का ( How Much Exercise Do Need for Heart Health ) ? नुकतंच करण्यात आलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. 

अभ्यासातून नेमकं काय समोर आलंय?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जामा जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झालाय. ज्यामध्ये हृदय मजबूत करण्यासाठी एक्सरसाईजचा ( Exercise ) सल्ला देण्यात आला आहे. अभ्यासात असं म्हटलंय की, जर तुम्ही दररोज 40 मिनिटं व्यायाम करू शकत नसाल तर काही हरकत नाही. व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही वीकेंडमध्येही व्यायाम करत असाल ते हृदय मजबूत ( Heart Health ) करण्यासाठी पुरेसं आहे.

अजून एका संशोधनात नमूद केल्यानुसार, मुळात तुम्ही किती व्यायाम करता हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुम्ही आठवड्यातून किती दिवस व्यायाम करता आणि कोणत्या वेळी व्यायाम करता याचा हृदयाच्या आरोग्यावर काही फरक पडत नाही. शारीरिक हालचालींमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोलेस्टेरॉल यांचा धोका कमी करता येतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, रोज व्यायाम केला तरी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं राहतं. रोज व्यायाम न करता वीकेंडला काबी प्रमाणात व्यायाम करणं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मुख्य म्हणजे, शरीराची हालचाल न होण्यापेक्षा विकेंडला व्यायाम करणं कधीही उत्तम. 

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here