Home स्पोर्ट्स धक्कादायक! प्रसिद्ध WWE चॅम्पियनची अचानक जगातून एक्झिट, ट्रिपल एचलाही दु:ख अनावर

धक्कादायक! प्रसिद्ध WWE चॅम्पियनची अचानक जगातून एक्झिट, ट्रिपल एचलाही दु:ख अनावर

0
धक्कादायक! प्रसिद्ध WWE चॅम्पियनची अचानक जगातून एक्झिट, ट्रिपल एचलाही दु:ख अनावर

Bray Wyatt: डब्ल्यूडब्ल्यूई चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सर्वांच्या आवडत्या प्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनने जगाचा निरोप घेतला आहे. यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईच्या विश्वात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ट्रिपल एचने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

WWE मध्ये ब्रे वॅट (Bray Wyatt) आणि द फीन्ड (The Fiend) या नावाने कुस्ती खेळणाऱ्या विंडहॅम रोटुंडाचे निधन झाले आहे. तो अवघ्या 36 वर्षांचा होता. कमी वयात त्यांनी अनेक स्पर्धा खेळून प्रेक्षकांची मने जिंकली होती. वॅट काही काळापासून गंभीर आजाराशी झुंजत होता. अखेर तो ही झुंज हरला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याला नेमका कोणता आजार झाला होता याचा खुलासा झाला नाही. 

सतत असलेल्या आजारपणामुळे वॅट हा रिंग आणि टेलिव्हिजनपासून दूर होता. याबद्दल चाहत्यांकडून नेहमी विचारणा केली जायची. मात्र आज त्याच्या आकस्मिक आणि अनपेक्षित मृत्यूची बातमी समोर आली आहे. रोटुंडा हा तिसर्‍या पिढीतील म्हणजेच माइक रोटुंडाचा मुलगा आणि ब्लॅकजॅक मुलिगनचा नातू होता.

ट्रिपल एचचे ट्विट 

ट्रिपल एचने ब्रे व्याटच्या निधनाबद्दल ट्विट केले आहे. WWE हॉल ऑफ फेम माईक रोटुंडा यांचा नुकताच एक कॉल आला. त्यांनी आम्हाला दु:खद बातमी कळवली. आमच्या WWE कुटुंबातील आजीवन सदस्य, विंडहॅम रोटुंडा, ज्याला ब्रे व्याट म्हणून ओळखले जाते, त्याचे आज अनपेक्षितपणे निधन झाले. आम्ही सर्व परिवार त्यांच्या कुटुंबाच्यासोबत असल्याचे ट्रिपल एचने यावेळी सांगितले. 

पुनरागमनाची होती आशा 

वॅट रेसलमेनिया 39 मध्ये भाग घेऊ शकला नाही. अलीकडेच ऑगस्टच्या सुरुवातीला तो परतेल असे वाटत होते. तो आजारातून बरा होत असल्याचेही सांगण्यात येत होते मात्र गुरुवारी त्याचा अचानक मृत्यू झाला.

ब्रे वॅटची कारकीर्द 

ब्रे वॅट दोन वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि एक वेळचा WWE चॅम्पियन राहिला आहे. त्याने मॅट हार्डीसोबत एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे. तसेच 2019 मध्ये, व्याटची WWE पुरुष रेसलर ऑफ द इयर म्हणून निवड झाली होती. 

रोटुंडा आणि त्याची आधीची पत्नी सामंथा यांनी 2012 मध्ये लग्न केले. त्याला दोन मुली आहेत. 2017 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रोटुंडा आणि डब्ल्यूडब्ल्यूई रिंग अनाउन्सर जोजो एकत्र असल्याचे समोर आले. जोजोने 2019 मध्ये एका मुलाला आणि 2020 मध्ये एका मुलाला जन्म दिला. जोजो आणि रोटुंडाचे गेल्यावर्षी लग्न झाले.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here