Home bollywood पती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत ‘उमराह’ करण्यासाठी पोहोचली हजला

पती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत ‘उमराह’ करण्यासाठी पोहोचली हजला

0
पती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत ‘उमराह’ करण्यासाठी पोहोचली हजला

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये असते. अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. एक्स पती तुरुंगातून सुटल्यानंतर राखीवर सतत आरोप करत आहे. दरम्यान, राखी पहिल्यांदाच उमरा करण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाली. या अभिनेत्रीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. राखी सावंतने गेल्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन ‘राखी सावंत’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करून  अचानक त्याला तुरुंगात पाठवल्यानंतर राखीवर आता गंभीर आरोप होत आहेत. आदिल खानपासून ते तिच्या जिवलग मैत्रिणीही राखीविरोधात वक्तव्य करत आहेत. दरम्यान, राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाली आहे.

राखी सावंत उमराहला रवाना झाली
25 ऑगस्ट रोजी सकाळी राखी सावंत आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईहून रवाना झाली आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा फ्लाइटमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. क्लिपमध्ये राखी हिजाब आणि काळा चष्मा असलेला प्रिंटेड फुल स्लीव्हज लांब ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की आज मी पहिल्यांदाच उमराहला जात आहे. मला बुलावा आला आहे.  मी खूप आनंदी आहे. तुम्ही सर्व मला तुमच्या प्रार्थनांमध्ये ठेवा. मी सर्वांसाठी प्रार्थना करेन.”

राखी सावंतने गेल्या वर्षी मे महिन्यात आदिल खानसोबत गुपचूप लग्न केलं होतं, ज्याची माहिती अभिनेत्रीने सात महिन्यांनंतर जानेवारी २०२३ मध्ये दिली होती. आदिलसोबत लग्नासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचं नाव बदलून फातिमा ठेवल्याचा खुलासाही राखीने केला होता.

राखी सावंतने आदिल खानसोबत लग्नाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी तिने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि मारहाणीसह अनेक गंभीर आरोप केले, त्यानंतर आदिलला अटक करण्यात आली. त्यानंतर म्हैसूर येथील एका इराणी तरुणीने आदिलवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व प्रकारामुळे आदिल ६ महिने तुरुंगातच होता. आता आदिल तुरुंगातून सुटला असून राखीवर तो गंभीर आरोप करताना दिसत आहे.   

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here