Wednesday, June 19, 2024

यूरिक अ‍ॅसिडमुळं सांधे देतात त्रास, ‘हे’ पदार्थ खाणं आत्ताच बंद करा

- Advertisement -

High Uric Acid: शरीरात युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागतो. शरीरातील प्युरिन (Purin) नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने युरिक अ‍ॅसिड तयार होते. अशा स्थितीत युरिक अ‍ॅसिड वाढू नये म्हणून काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे, असा सल्ला दिला जातो. युरिक अॅसिड हे खराब लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या सवयी, पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करणे यामुळं युरिक अॅसिडची मात्रा वाढते. शरीरातील रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर सांधेदुखी, किडनी, हृद्यासंबंधित विकारसारखे आजार मागे लागतात. (Uric Acid Causing Food)

युरीक अॅसिड वाढल्यानंतर कधी कधी ते शरीरात क्रिस्टल स्वरुपात सांध्यांजवळ जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळं सांधदुखी वाढीस लागते. कधीकधी युरिक असिडची उच्च पातळीमुळं किडनी स्टोनचा धोका निर्माण करते. युरिक अॅसिडची पातळी वाढणे याला वैदयकीय भाषेत हायपरयुरेसेमिया असं म्हणतात. जेव्हा शरीरातील युरिक अॅसिड वाढते तेव्हा तुमच्या बोटांना आणि बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवतात. तर, पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होऊ शकतात. 

युरिक अॅसिडची पातळी वाढण्याची कारणे

रात्री गरजेपेक्षा जास्त खाणे
खराब जीवनशैली
पाणी कमी प्रमाणात पिणे
वेळेवर न जेवणे
जास्त प्रणामात नॉन व्हेज खाणे
तणाव 

युरिक अॅसिड वाढल्याने शरीरात गाऊट नावाचा आजार पसरु शकतो. या स्थितीत शरिरात संधीवाताचा आजार जडू शकतो. गाउटमुळं अंगठ्याचा भाग, पायाचा घोटा आणि गुडघे या अवयवांना नुकसान पोहोचवतो. 

हाय युरिक अॅसिड असल्यास या पदार्थांचे चुकूनही सेवन करु नका

मनुका

मनुका या द्राक्ष्यापासून बनवल्या जातात. मात्र त्यात प्युरीन असते. प्युरीन जास्त प्रमाणात सेवन केल्यास गाउटची (अर्थरायटिस) समस्या अधिक वाढू शकते. तसंच, त्यामुळं रक्तातील युरिक अॅसिडची मात्रादेखील वाढवते. 

चिंचेचा रस

चिंचेच्या रस तसा गुणकारी असतो मात्र गाउटने त्रस्त असणाऱ्या लोकांनी चिंचेचा रस खाणे टाळावे. फ्रक्टोज जास्त प्रमाणात असल्याने युरिक अॅसिडची मात्रा वाढू शकते. 

सफरचंद
सफरचंदमध्ये नैसर्गिकरित्या फ्रक्टोज असते. त्यामुळं अर्थराइटिसच्या स्थिती आणखी बिघडवू शकते. 

खजूर 

खजूरमध्ये प्युरीन कमी प्रमाणात असते. मात्र फ्रक्टोजची मात्रा जास्त असते. त्यामुळं अशा स्थितीत खजूर खाणे तुमच्या रक्तातील फ्रक्टोजची मात्रा वाढू शकते. 

चिकू 

चिकुमध्येही फ्रक्टोजची मात्रा अधिक असते. त्यामुळं युरिक अॅसिड नियंत्रीत करण्यासाठी चिकु खाणे टाळावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news