Home ताज्या घडामोडी वाईगौळ आश्रमशाळा संचालकांना समाज कल्याण विभागाचा दणका 

वाईगौळ आश्रमशाळा संचालकांना समाज कल्याण विभागाचा दणका 

0

ॲड. राठोड यांच्या पत्रानंतर मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रीत

सोई- सुविधा नसल्याने आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने मुलींचे वसतिगृह बंद 

मानोरा :- तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून त्याला वेळीच पायबंद करणे आवश्यक झाले आहे. नाहीतर आश्रमशाळा स्थापन करण्यामागील राज्यशासनाच्या प्रामाणिक उद्देशाला हरताळ फासल्यासारखे ठरेल. तालुक्यातील सर्व बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना दर्जेदार व गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी ॲड. श्रीकृष्ण राठोड यांच्यासारखी अभ्यासू आणि कठोर भूमिका घेणे आज काळाची गरज झाली आहे. अन्यथा मागासवर्गीय अधिक मागास होतील.

वाईगौळ येथिल आश्रमशाळेत निवासी मुलींना राहण्याची सोय नसल्यास आणि सुरक्षिततेची खात्री नसल्यास मुलींना वसतिगृहात प्रवेश देऊ नये आणि दिला असल्यास तात्काळ हजेरी पटावरून कमी करावे, असा जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी आदेश देऊन आश्रमशाळेच्या संचालकांना दणका दिला आहे. या आदेशानुसार सबंधित मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांनी तात्काळ खुलासा सादर करत मुलींची नावे हजेरी पटावरून कमी केल्याची माहिती मिळत आहे. जर आश्रमशाळेत निवास व्यवस्था नव्हतीच तर हा संस्था संचालकांचा अट्टाहास कशासाठी होता? त्यामागील त्यांचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहे. या प्रश्नांना वेळीच वाचा फोडली नाही तर विजाभज मागासवर्गीय यांच्यासाठी वरदायी ठरलेल्या या शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजनेच्या अंमबजावणीत झारीतील शुक्राचार्य कोण हे कळणार नाही. त्यांना वेळीच पायबंद घातले नाहीत तर मागासवर्गीयांच्या आणि बहुजनांचे हित जोपासणारे यांना सजग होणे आवश्यक झाले आहे.

दर्जेदार शिक्षण आणि सर्व व्यवस्था आश्रमशाळा व्यवस्थापनाकडून होणे आवश्यक आहे. व्यवस्था

अद्यापही वाईगौळ आश्रमशाळेत नाहीत. एवढे गंभीर आरोप आणि त्याची सिद्धता झाल्यानंतरही जिल्हा समाज कल्याण आयुक्त, वाशिम यांनी स्वतः अद्यापही शाळेला भेट न देणे, ही बाब गंभीर वाटते. अशा या गंभीर प्रकरणात स्वतः त्यांनी भेट देणे अपेक्षित आहे.

ॲड. श्रीकृष्ण राठोड

 

समाज कल्याण कार्यालयाने सुचना दिल्यानुसार मुलींना राहायची सोय नसल्याने त्यांची नावे हजेरी पटावरून कमी करण्यात आली असून आता त्यांच्या जागेवर मुलांना प्रवेश देण्यात येईल.

– धनंजय मंगाम, मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा, वाईगौळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here