Home हेल्थ वैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार

वैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार

0
वैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार

Cancer Killing Pill: जगातील सर्वाधिक जीवघेण्या आजारांपैकी एक म्हणजे कॅन्सर आहे. अनेक रुग्ण तर कॅन्सरचं निदान झाल्यावरच सगळ्या आशा सोडून देतात. काहींना तर कॅन्सर म्हणजे मृत्यूच आहे असं वाटतं. दरम्यान, कॅन्सवरील उपचार करताना रुग्णांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. दरम्यान, आता मात्र कॅन्सरला शरिरात वेळेआधी वाढण्याआधीच संपवणं शक्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवर औषध शोधणाऱ्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर वैज्ञानिकांना कॅन्सरवरील औषध सापडलं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. 

हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. कॅन्सरला मुळासकट संपवणाऱ्या या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. आना ओलिव्हिया हिली नावाच्या या मुलीचा 9 वर्षांची असतानाच मृत्यू झाला होता. पण या औषध निर्मितीत तिचं मोलाचं योगदान आहे. 

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सिटी ऑफ होप हॉस्पिटलने 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध विकसित केलं आहे. हे केंद्र अमेरिकेच्या सर्वात मोठ्या कॅन्सर केंद्रांपैकी एक आहे. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू पाहणाऱ्या या औषधाला 1996 मध्ये जन्म झालेल्या आना ओलिव्हिया हिली हिचं नाव देण्यात आलं आहे. 9 वर्षांची असताना तिचं निधन झालं होतं. तिला न्यूरोब्लास्टोमा नावाचा कॅन्सर झाला होता. याच कॅन्सरमुळे 2005 मध्ये तिचं दुर्देवी निधन झालं. न्यूरोब्लास्टोमा हा लहान मुलांना होणारा कॅन्सर आहे. 

सिटी ऑफ होपमध्ये काम करणाऱ्या 68 वर्षीय लिंडा मलकास यांनी न्यूयॉर्क पोस्टशी संवाद साधताना सांगितलं की, “त्या लहान मुलीला काहीतरी विशेष कऱण्याची इच्छा असल्याची मला जाणीव होती. पण ती 9 वर्षांची असतानाच न्यूरोब्लास्टोमामुळे मृत्यू झाला. हा लहान मुलांना होणारा कॅन्सर आहे. अमेरिकितेत दरवर्षी 600 मुलांना या कॅन्सरचं निदान होतं”.

आनाचं 2005 मध्ये निधन झालं होतं. मात्र त्याआधी तिच्या कुटुंबाने लिंडा यांची भेट घेतली होती. लिंडा यांनी सांगितलं की, “मी आनाच्या वडिलांना भेटली तेव्हा ती शेवटच्या स्टेजा होती. मी न्यूरोब्लास्टोमावर काही करु शकतो का अशी विचारणा त्यांनी मला केली होती. त्यांनी माझ्या लॅबसाठी 25 हजार डॉलर्सचा चेकही दिला होता”.

70 प्रकारच्या कॅन्सरवर चाचणी

सतत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या औषधाचे सकारात्मक परिणाम येत असल्याने कॅन्सर रुग्णांसाठी हा मोठा आशेचा किरण ठरत आहे. दाव्यानुसार, या औषधाची 70 प्रकारच्या कॅन्सरवर चाचणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, युट्स कॅन्सर, स्किन कॅन्सर, लंग्ज कॅन्सर यांचा सहभाग आहे. या औषधाने चाचणीत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध तयार करण्यात आलं आहे. कॅन्सर सेल्समध्ये आढळणाऱ्या प्रोटीन- प्रोलिफेरेटिंग सेल न्यूक्लियर एंटीजन (PCNA) ला हे औषध टार्गेट करतं. 

कॅन्सर प्रोटीन संपवण्यात मदत

ज्या केंद्रात हे औषध बनवलं जात आहे, त्या टीमच्या प्रोफेसर लिंडा मलकास यांनी सांगितले की, हे औषध कॅन्सरचे प्रथिन काढून टाकण्यास मदत करते. यामुळे ट्यूमर लवकर विकसित होत नाही. पण तरी ट्यूमर वाढला तरी तो दूर करण्यात हे औषध प्रभावी ठरले आहे. मलकास यांनी दिलेल्या माहितीनुसार, AOH1996 औषध सध्या सिटी ऑफ होप येथे पहिल्या टप्प्यात वैद्यकीत चाचणीतआहे. AOH1996 ला शेवटच्या चाचणीत यश मिळाले होते.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here