Home हेल्थ शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका

शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका

0
शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका

health News : गेल्या काही वर्षांपासून जगभरासोबत भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 101 दशलक्षहून अधिक आहे. ही संख्या पाहता 2050 पर्यंत मधुमेहाचे रुग्ण जगभरात 100 कोटी पर्यंत जाण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या करिता शास्त्रज्ञांनी 1990 ते 2021 या काळात 204 देशांमधील 27,000 हून अधिक रुग्णांचा डेटाचा अभ्यास केला, त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे. (health News Scientists said 2 main causes of Diabetes and control blood sugar follow these 5 habits diabetes symptom health tips in marathi)

खरं तर हा असा आजार आहे ज्यावर उपचाराने बरा होतं नाहीत. तर त्यावर नियंत्रण ठेवल्यास आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. चला जाणून घेऊया मधुमेहाचं प्रमाण का वाढत आहे आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करायला हवे…

‘या’ टाइपचं सर्वाधिक रुग्ण 

मधुमेह हा दोन प्रकारचा असतो, एक टाइप 1 आणि टाइप 2…शास्त्रज्ञांनी केलेल्या  अभ्यासानुसार टाइप 2 मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. टाइप 1 मधुमेह हा शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. अशा स्थिती रुग्णाला वेळोवेळी इंजेक्शन किंवा पंपाद्वारे इन्सुलिन घ्यावं लागतं. हा प्रकार साधारण मुलांमध्ये दिसून येतो. तर टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसे नसतं. हा प्रकार प्रौढांमध्ये दिसून येतो. या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येतो.  

मधुमेह कसा टाळावा, काय सांगतात डॉक्टर?

मधुमेह हा एक सायलेंट किलर आजार असून तो रुग्णाच्या शरीराचा हळूहळू नाश करतो. त्यामुळे या रुग्णांना इस्केमिक हृदयरोग, पक्षाघात, कमी दृष्टी, पायात व्रण येण्याचा सर्वाधिक धोका असतो. 

मधुमेहाची प्रमुख दोन कारणं 

शास्त्रज्ञांनी मधुमेह वाढण्याची दोन मुख्य कारणं सांगितली आहेत. त्यांच्या मते, तुमचं वय आणि लठ्ठपणा. बैठी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोकांचा बीएमआय वाढत असल्याचं संशोधकांचं मत आहे. 

लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका!

उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा अति प्रमाणात सेवन केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. 
अनेक लोकांकडे निरोगी पदार्थांसाठी पैशांची कमतरता असल्याने वजनावर नियंत्रण राहत नाही. 
अति-प्रक्रियायुक्त पदार्थांचे जास्त जास्त सेवन केल्यामुळे वजन वाढतं.
चरबीयुक्त आणि साखरेचे जास्त सेवन केल्यामुळेही लठ्ठपणा वाढतो. 
कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाल न केल्यामुळेही वजन झपाट्याने वाढतं.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा!

वजन कमी करा.
फायबरचे सेवन वाढवा आणि कडधान्य खा.
कामावर जास्त वेळ बसण्याऐवजी लहान ब्रेक घ्या.
दररोज नियमत चाला. 
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

मधुमेहाची लक्षणं 

जास्त तहान
नेहमी थकवा
अनावश्यक वजन कमी होणे
कमी किंवा अंधुक दृष्टी
वारंवार मूत्रविसर्जन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here