Sunday, June 23, 2024

शिक्षण संस्थेच्या अनियमिततेची पाठराखण करणाऱ्या सरपंचाला संस्थेत सदस्य पदाचे बक्षीस

- Advertisement -

संचालक मंडळात वर्णी लावण्यासाठीच वादग्रस्त खाजगी शिक्षण संस्थेला मदत केल्याची जनतेत चर्चा

मानोरा:- तालुक्यातील वाईगौळ ह्या गावाला असलेली प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळा आर्थिक अनियमितता आणि शासनाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात कामकाज चालवीत असल्याबाबत इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा, प्रादेशिक आणि संचालक कार्यालयाकडून सातत्याने कारणे दाखवा नोटीस ते दंडात्मक कारवाई आणि एक संधी दिल्या नंतरही संस्था संचालकांच्या मनमानीला चाप लागले नसल्याच नुकत्याच संचालक मंडळातील नेमणुकांवरून समोर येत आहे. तपस्वी संताच्या नावाने चालू असलेल्या निवासी आश्रम शाळेच्या भ्रष्ट संस्था संचालकांची भविष्यातील लाभाचा अंदाज घेऊन पाठराखण करणाऱ्या वाईगौळ येथील विद्यमान सरपंच असलेले उमेश राठोड यांचा या संस्थेमध्ये सदस्य म्हणून बेकायदेशीर शिरकाव झाल्याची चर्चा आज जन-माणसात रंगलेली आहे. सरपंचाने बेकायदेशीर ठराव देत अनियमिततेला समर्थन केल्याचे बक्षीस मिळाल्याच्या ह्या निवडीवरून गाव आणि पंचक्रोशी मधील चर्चांवरून बोलले जात आहे.

वाई गौळ ह्या गावामध्ये विमुक्त जाती भटके जमाती प्रवर्गातील नागरिकांच्या पाल्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि उच्च भौतिक सुविधा असणारे निवासी वस्तीगृहयुक्त प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा शासनाकडून खाजगी शिक्षण संस्थेला नियम व अटीवर चालवण्यात देण्यात आलेली आहे.ही संस्था मागील काही महिन्यांपासून भ्रष्ट संस्थासंचालकांच्या व्यवहारामुळे आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या उद्देशांची पूर्ती करत नसल्याचे जिल्हा, प्रादेशिक आणि संचालक कार्यालयाने आदेश पारीत केल्याने स्पष्ट झालेले आहे.

निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि येथे (केवळ वस्तीगृहाच्या हजेरीपटावर) निवासाला असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना संरक्षण आणि शासकीय नियम निकषाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात संबंधित संस्था अक्षम ठरत असल्याचे ताशेरे जिल्हा चौकशी समिती, प्रादेशिक उपसंचालक, अमरावती यांनी वेळोवेळी लेखी दिलेले आहे.

भ्रष्टाचार अनागोंदी आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या नियम व निकषांच्या पूर्तता न करणाऱ्या या निवासी आश्रम शाळेच्या भ्रष्ट संचालक मंडळाचे पाठराखण करणारा ठराव येथील सरपंचांनी गतवर्षीच्या जुलै महिन्यामध्ये घेतला होता ज्या संदर्भात मोठ्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे झळकल्याही होत्या.

अशा भ्रष्ट संस्था संचालकांशी येथील सरपंचांनी समझोता करून आणि त्यांची पाठराखण करीत भविष्यामध्ये या शिक्षण संस्थेमधील संचालक मंडळात आपली वर्णी लागावी यासाठीच असा बेकायदेशीर ठराव बहुदा घेतला होता, अशा चर्चा येथील नुकत्याच करण्यात आलेल्या बेकायदेशीर नियुक्त्यावरुन चर्चिली जात आहे.

 

सदस्य म्हणुन नेमणूक करण्याचा अधिकार हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाला असून, संस्थेच्या पदाधिकारीद्वारा सभा आयोजित केल्या जात नसल्याने मा. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे निदेश देण्यासाठीचा अर्ज प्रलंबित आहे. कार्यकारी मंडळाची सभा न घेता अशा प्रकारे संस्थानचे अध्यक्ष आणि सचिवांनी त्यांची पोळी शेकण्याकरीता बेकायदेशीर नियुक्त्या केल्या असतील, तर त्या सुरुवातीपासुनच अवैध ठरतात. ॲड. मनोहर राठोड, संस्थान सदस्य

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news