Home हेल्थ श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी अशी करावी उपासना: सर्वांचीच मनोकामना पूर्ण करणारी मुगाची शिवमूठ

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी अशी करावी उपासना: सर्वांचीच मनोकामना पूर्ण करणारी मुगाची शिवमूठ

0
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी अशी करावी उपासना: सर्वांचीच मनोकामना पूर्ण करणारी मुगाची शिवमूठ

छत्रपती संभाजीनगर | रोशनी शिंपी4 महिन्यांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्रावणात दर सोमवारी शिवशंकराचे पूजन केले जाते. प्रामुख्याने शिवमूठ अर्पण केली जाते. मात्र, दर सोमवारी वेगळी शिवमूठ असते. या शिवमुठीचे आध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे. तिसऱ्या सोमवारी वाहण्यात येणाऱ्या मुगाच्या शिवमुठीचे आध्यात्मिक तसेच आरोग्यदृष्ट्या महत्त्व जाणून घेणे भाविकांसाठी महत्त्वाचे आहे.

भगवान शंकराला मूग प्रिय
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भगवान शंकराला मूग या धान्याची शिवमूठ अर्पण करावी. भगवान शंकराला हे मूग अर्पण केल्याने आपल्या सगळ्या प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती व सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर मुगावर लक्ष्मीचा वास असतो. भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारे मूग अर्पण केल्याने घरामध्ये लक्ष्मीचादेखील चिरकाल निवास राहतो.

असे वहा शाबूत मूग : बेल, धोत्रा फुले वाहून 3 मोठ्या शिवमुठी अर्पण करा
नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे ।।
शिवमूठ अर्पण करण्यापूर्वी शंकराला जल, गंगाजल पंचामृत, दुधाने अभिषेक करून घ्यावा. केवड्याचे अत्तर लावावे. भस्म, चंदनाचा लेप करून बेलपत्र, धोत्र्याची फुलं अर्पण करावी. शाबूत मूग स्वच्छ धुऊन ३ मुठी घ्याव्यात. वरील मंत्र ३ वेळा म्हणून भगवान शंकराला शिवमूठ अर्पण करावी. (वेदमूर्ती : पांडव गुरुजी)

आयर्न देणारे मूग हृदयासाठी सर्वोत्तम
मुगामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर असते मोड आलेले मूग घेतल्यास उपयुक्त. हृदयासाठी सर्वोत्तम आहेत. याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करते. मधुमेहींच्या लघवीचे नियंत्रण मूग करतात. थायरॉइडमध्येही फायदा होतो. मुलांना दिल्यास शरीर बळकट होते. (आहारतज्ज्ञ : अलका कर्णिक)

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here