Home Blog स्ट्रीट फुड म्हणून आवडीने मोमोज खाताय?; शरीराचे होतेय नुकसान

स्ट्रीट फुड म्हणून आवडीने मोमोज खाताय?; शरीराचे होतेय नुकसान

0
स्ट्रीट फुड म्हणून आवडीने मोमोज खाताय?; शरीराचे होतेय नुकसान

Momos Side Effects: स्ट्रीट फुड (Street Food) म्हणून मोमोज (Momos) आता अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. हिमालयाची फेमस डिश असलेल्या मोमोजचे स्टॉल आता मुंबईतील  (Mumbai) गल्लीगल्लीत सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मोमोज अनेकांचे फेव्हरेट फुड झाले आहे. त्यात स्ट्रीट फुड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण हेच स्ट्रीट फुड तुमच्या जीवावर उठू शकते. अतिप्रमाणात किंवा रोज रोज मोमोज खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात. मोमोज खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. मोमो अतिप्रमाणात खाण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते पाहूयात. (Momos Side Effects On Health)

सगळ्यात पहिले ते मोमोज हे अॅल्युमिनियम स्टीमर्समध्ये शिजवले जातात आणि अॅल्युमिनियम हे शरीरासाठी हानिकारक असतात. तसंच, मोमोज मैद्यापासून बनवले जातात. मैदा हा आल्मयुक्त असतो. हे पीठ शरीरात जाऊन हाडांचे कॅल्शियम शोषून घेते. तसंच, मैदा नीट पचतही नाही. तसंच, मैदा खाल्ल्याने अॅसिटिडी, ब्लॉटिंग, बद्धकोष्टता असे आजार मागे लागू शकतात. 

दुसर कारण म्हणजे बाजारात बनवलेले मोमोज हे पांढरे असतात तर घरी बनवलेले मोमोज हे थोडेसे पिवळसर दिसतात. बाहेर बनवल्या जाणाऱ्या मोमोजमध्ये ब्लीच, क्लोरीन वायू, बेंझॉइल पेरोक्साइड, अझो कार्बामाइड युक्त असतात. त्यामुळं ते पांढरे आणि मऊ दिसतात. या रसायनांमुळे किडनी आणि स्वादुपिंडाचे नुकसान होते आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.

मोमोजसोबत दिली जाणारी लाल चटणीही आवडीने खाल्ली जाते. तिखट अशी ही चटणीदेखील शरीरासाठी हानिकारक असते. कारण या चटणीची गुणवत्ता कमी असते. ज्यामुळं मूळव्याध, जठराची सूज, पोट आणि आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.

काही मोमोज विक्रेते मोमोसमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG)  आणि अजिनोमोटो नावाच्या रसायनाचा वापर करतात. यामुळे त्याची चव वाढते आणि ते सुगंधी बनते. या एमएसजीमुळे लठ्ठपणा वाढतो. मेंदू आणि मज्जातंतूंच्या समस्या, छातीत दुखणे, हृदय गती वाढणे, बीपी अशा तक्रारी निर्माण होतात

रस्त्याच्या कडेला मिळणारे मोमोज चवदार वाटत असले तरी त्याचे तोटे अनेक आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते आरोग्यदायी नाही. रोजच्या रोज मोमोजचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला काही ना काही शारीरिक समस्या होत राहतील.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here