Home घर संसार Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशीला राशीनुसार ‘या’ वस्तूंचं करा दान, घरात वाढेल सुख-समृद्धी

Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशीला राशीनुसार ‘या’ वस्तूंचं करा दान, घरात वाढेल सुख-समृद्धी

0


v and r

एकादशीच्या दिवशी काही गोष्टी दान केल्याने तुमच्या घरात कायम सुख-समृद्धी नांदते, असं मानलं जातं. प्रत्येकानेे त्याच्या राशीनुसार दान केल्यास त्याला विशेष फायदा होतो,असं म्हटलं जातं. कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावं ते जाणून घेऊयात.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) म्हणतात. राज्यातील विविध भागांतील लोक या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) किंवा पद्मनाभा एकादशी असंही संबोधलं जातं. यावेळी आषाढी एकादशी 29 जूनला आहे. एकादशीच्या दिवशी काही गोष्टी दान केल्याने तुमच्या घरात कायम सुख-समृद्धी नांदते, असं मानलं जातं. प्रत्येकानेे त्याच्या राशीनुसार दान केल्यास त्याला विशेष फायदा होतो,असं म्हटलं जातं. कोणत्या राशीच्या (Donation As Per Zodiac Sign) लोकांनी काय दान करावं ते जाणून घेऊयात.

मेष : या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी अन्नाचं दान करावं. याशिवाय कुठल्याही धार्मिक स्थळावरून बेलाचं रोप लावणं शुभ मानले जाते. गहू किंवा गोड पदार्थही तुम्ही दान करू शकतात. रूग्णालयात खिचडी आणि फळेही दान करू शकता.

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे. पांढरे कपडे धार्मिक स्थळावरील पुजाऱ्यांना दान करावे. तसेच गायीला चारा, चपाती किंवा गुळ खायला घाला.

मिथुन: या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचं वस्त्र दान करावं. गाईला हिरवागार चारा खायला द्यावा. तसेच धार्मिक पुस्तकांचं वितरण करावं. हे या राशीसाठी शुभ ठरेल.

कर्क : या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे. पांढरे किंवा पिवळे कपडे दान करणे लाभदायक असते. गायीला चारा द्यावा.

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी गहू दान करावे. तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा. श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे.

कन्या: या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे. गायीला चारा द्यावा. मंदिरात घंटा अर्पण करू शकतात आणि रुग्णालयात फळेही दान करू शकता.

तूळ : या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती, कापूर, पांढरे कपडे दान करावे. सुगंधित अगरबत्तीही तुम्ही दान करू शकता.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी गहू, मसुरची डाळ दान करावी. लाल कपडे दान केल्याने अनेक आजारापासून मुक्ती मिळेल.

धनु: धनु राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि केळं दान केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होईल. धार्मिक पुस्तकांचे वितरणही तुम्ही करु शकतात. गोड वस्तूंचेही दान मंदिरात करावे.

मकर: या राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद डाळ दान करावे. काळे कपडे आणि लोखंडी कढईचं दान उत्तम ठरेल. तसेच शनी मंदिरात जाऊन तेल वाहावे.

कुंभ: या राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीळ याचं दान करावं. गरिबांमध्ये काळे वस्त्र वाटा. विष्णु मंदिरात अन्न आणि पिवळं वस्त्र दान करावं.

मीन: या राशीच्या लोकांनी चणाडाळ आणि फळांचं दान करावं. अथवा श्री विष्णु मंदिरात पिवळे कपडे द्यावेत.

सूचना- वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. यातील कोणत्याही तथ्यांचा आम्ही दावा करत नाही.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here