Home घर संसार Ashadhi Ekadashi 2023 | मंदिरात जाता आलं नाही तर घरी करा आषाढी एकादशीची पूजा, मुहूर्त आणि व्रताची पद्धत जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2023 | मंदिरात जाता आलं नाही तर घरी करा आषाढी एकादशीची पूजा, मुहूर्त आणि व्रताची पद्धत जाणून घ्या

0


vitthal rukmini puja

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून उपवास व उपासनेचा संकल्प करावा. तुम्ही ज्या प्रकारचा उपवास करणार आहात त्यानुसार संकल्प करावा.

आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर योगनिद्रेत जातात. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे जातात. मात्र ज्यांना शक्य नसतं ते जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतात. ज्यांना मंदिरात जाणेही शक्य नाही ते लोक घरीच मनोभावे पूजा करतात. यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने आषाढी एकादशीच्या पूजेचा मुहूर्त, व्रताची आणि पूजेची पद्धत जाणून घ्या. (Ashadhi Ekadashi Vrat)

मुहूर्त (Ashadhi Ekadashi Muhurt)
– विजय मुहूर्त – दुपारी 02:44 ते 03:40 पर्यंत
– अभिजीत मुहूर्त – सकाळी 11:57 ते दुपारी 12:52 पर्यंत, दुपारी 12:25 ते 02:09 पर्यंत , दुपारी 02:09 ते 03:54, संध्याकाळी 05:38 ते 07:23

आषाढी एकादशीचं व्रत आणि पूजा कशी कराल?
आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून उपवास व उपासनेचा संकल्प करावा. तुम्ही ज्या प्रकारचा उपवास करणार आहात त्यानुसार संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती किंवा विष्णूसह लक्ष्मीची मूर्ती चित्र पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करा. काही ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीला पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर झोपवण्याचा विधीही केला जातो. मूर्तीची स्थापना केल्यावर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून मूर्तीला टिळा लावावा. भगवान विष्णूला पिवळे वस्त्र आणि देवी लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करा. यानंतर अबीर, गुलाल, तांदूळ, फुले, आदी वस्तू देवाला अर्पण करा. प्रसाद अर्पण केल्यानंतर आरती करावी आणि प्रसाद वाटपानंतर देवशयनी एकादशीची कथेचं पारायण करावं. संध्याकाळी सात्विक आहार घेऊन भजन कीर्तन करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना अन्नदान करून उपवास सोडावा.

आषाढी एकादशीची कथा
फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करायला सांगितलं. राजाने हे व्रत मनोभावे केलं. त्यायोगे वरुणराजाने कृपा केली. योग्यवेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले.
मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली, तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करा.

गोविंदशयन व्रत
या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत. काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात. या साऱ्या व्रतांना ‘गोविंदशयन व्रत’ असं म्हटलं जातं.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here