Home स्पोर्ट्स Asian Games 2023 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ 20 वर्षांच्या अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी!

Asian Games 2023 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ 20 वर्षांच्या अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी!

0
Asian Games 2023 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ 20 वर्षांच्या अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी!

Asian Games Team Pakistan Squad : येत्या 28 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games 2023) पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान संघाचे (Pakistan Cricket team) कर्णधारपद 20 वर्षीचा अनकॅप्ड युवा अष्टपैलू खेळाडू कासिम अक्रमकडे सोपवण्यात आलंय. याशिवाय विकेटकिपरची जबाबदारी मुहम्मद अखलाककडे देण्यात आली होती. त्यामुळे आता आशियन गेम्स स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होणार आहेत.

पाकिस्तान संघाचे नेतृत्व कासिम अक्रमकडे आहे, ज्याने 20 प्रथम श्रेणी सामने आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. आसिफ अली पासून  उस्मान कादिर अशा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलंय. तर हैदर अली, शाहनवाज डहानी, खुशदिल शाह, अमीर जमाल, अर्शद इक्बाल, मोहम्मद हसनैन पाकिस्तान संघातील प्रमुख खेळाडू संघात सामील करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या एकूण 8 जणांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ:

कासिम अक्रम (कर्णधार), ओमेर बिन युसूफ (उपकर्णधार), अमीर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज डहानी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादिर.

पाहा ट्विट –

बीसीसीआयने देखील मागील महिन्यात टीम इंडियाची घोषणा केली होती. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. तर संघात युवा खेळाडू रिंकू सिंह याला देखील संधी मिळाली आहे. तर महिला संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरूष संघ 

ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (WK), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (WK)

राखीव खेळाडू – यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.

आणखी वाचा – अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! पाकिस्तानची फिल्डींग झाली चेष्टेचा विषय; Video पाहून खदाखदा हसाल

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (WK), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री.

राखीव खेळाडू : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here