Home घर संसार Bakri Eid | देशभरात साजरी होतेय बकरी ईद, या सणाला कुर्बानी देण्याच्या परंपरेमागची रंजक कथा जाणून घ्या

Bakri Eid | देशभरात साजरी होतेय बकरी ईद, या सणाला कुर्बानी देण्याच्या परंपरेमागची रंजक कथा जाणून घ्या

0


bakri eid namaj

ईदची नमाज झाल्यावर बकरी किंवा इतर प्राण्यांची कुर्बानी दिली जाईल. बकरी ईदला कुर्बानी देण्याचं खास कारण आहे.

देशभरात आज बकरी ईद (Bakri Eid 2023) अर्थात ईद-उल-अजहा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. ईदची नमाज झाल्यावर बकरी किंवा इतर प्राण्यांची कुर्बानी दिली जाईल. बकरी ईदला कुर्बानी देण्याचं खास कारण आहे. कुर्बानीनंतर (Kurbani On Bakri Eid) जे मांस निघतं त्याचे तीन वाटे केले जातात. त्यातला एक हिस्सा स्वत:साठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरीबांसाठी ठेवला जातो. बकऱ्याच्या मटणाचे असे तीन वाटे केल्यानंतरच कुर्बानीचं मटण योग्य मानलं जातं. (Eid Mubarak)

कशी सुरु झाली कुर्बानीची परंपरा?
इस्लामिक धर्माच्या मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम हे अल्लाहचे पैगंबर होते. हजरत इब्राहिम हे सदैव लोककल्याणात मग्न राहिले. त्यांनी आयुष्याचा अधिक काळ समाजसेवेत घालवला. मात्र, अनेक वर्ष त्यांना मुलं झालं नाही. यानंतर त्यांनी अल्लाहची ईबादत केली. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्याचं नाव इस्माईल ठेवण्यात आलं. मुलाच्या जन्मानंतर, इब्राहिम यांना एक स्वप्न पडलं. अल्लाहने स्वप्नात त्यांना कुर्बानी देण्याची आज्ञा दिली. त्यांनी आधी प्रथम उंटाचा बळी दिला. यानंतर त्यांना पुन्हा एक स्वप्न पडलं आणि त्याला आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश देण्यात आला.

इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिमसाठी यांच्यासाठी अल्लाहचा आदेश होता की, त्यांना प्रिय वस्तूची कुर्बानी द्यावी लागेल. यानंतर हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक मान्यतेनुसार, पुत्र इस्माईलची कुर्बानी देण्यापूर्वी हजरत इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बंद केले आणि त्याचा गळ्यावर चाकू ठेवला. मात्र, त्यांनी कुर्बानीसाठी चाकू वर उगारताच अचानक मुलगा इस्माईल यांच्याऐवजी एक डुंबा (बकरी) तेथे आला. हजरत इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माईल सुरक्षित होता आणि त्यांनी बकऱ्याची कुर्बानी दिली होती.

इस्लामिक मान्यतेनुसार, ही केवळ अल्लाहची परीक्षा होती. अल्लाहच्या आदेशानुसार हजरत इब्राहिम आपल्या मुलाचीही कुर्बानी देण्यास तयार झाले. इब्राहिम यांचा त्याग पाहून अल्लाहने त्यांना पैगंबर बनवलं. तेव्हापासून बोकडाचा बळी देण्याची परंपरा सुरू झाली.

दरवर्षी बकरी ईदची तारीख धुल हिज्जा महिन्यात चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. इस्लामिक कालगणनेनुसार, धूल हिज्जा हा इस्लामचा बारावा महिना आहे.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here