Home घर संसार Chaturmas 2023 | 148 दिवसांचा चातुर्मास उद्यापासून सुरू; जाणून घ्या पुढचे पाच महिने काय करावं अन् काय करू नये?

Chaturmas 2023 | 148 दिवसांचा चातुर्मास उद्यापासून सुरू; जाणून घ्या पुढचे पाच महिने काय करावं अन् काय करू नये?

0


148 दिवसांचा चातुर्मास उद्यापासून सुरू; जाणून घ्या पुढचे पाच महिने काय करावं अन् काय करू नये?

चातुर्मास याचे विशेष महत्त्व आहे. ते पाळण्यासाठी काही नियम देखील आहे. हिंदू धर्मात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हे चार महिने एकत्र करून चातुर्मास (Chaturmas 2023) तयार होतो. यावेळी चातुर्मास 29 जून ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

चातुर्मास याचे विशेष महत्त्व आहे. ते पाळण्यासाठी काही नियम देखील आहे. हिंदू धर्मात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हे चार महिने एकत्र करून चातुर्मास (Chaturmas 2023) तयार होतो. यावेळी चातुर्मास 29 जून ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, जो कार्तिकच्या देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत चालतो. या काळात श्री हरी विष्णू योगनिद्रामध्ये तल्लीन राहतात, म्हणून शुभ कार्ये वर्ज्य आहेत. याच काळात आषाढ महिन्यात (Chaturmas Months) भगवान विष्णू वामनाच्या रूपात अवतरले.

चातुर्मासाचे चार महिने अत्यंत पवित्र

चातुर्मासाचे चार महिने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. आषाढ महिन्याच्या शेवटच्या काळात भगवान वामन आणि गुरुपूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदात होतो आणि त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. अश्विन महिन्यात देवी आणि शक्तीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात आणि संसारात शुभ कार्य सुरू होतात.

या चातुर्मासात काय करावं?

आषाढ पौर्णिमेला गुरुंची पूजा करावी. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी. त्यामुळे वैवाहिक जीवन, सुख आणि दीर्घायुष्य लाभेल. भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी. हे संतती आणि विजयाचे वरदान देईल. अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा. यामुळे विजय, शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल. कार्तिकमध्ये श्री हरी आणि तुळशीची पूजा केली जाते. यातून राज्य सुख आणि मुक्ती-मोक्षाचे वरदान मिळते.

चातुर्मासातील नियम नेमके काय?

चातुर्मासात एकदाच जेवण घेणे उत्तम मानले जाते. या चार महिन्यांत तुम्ही जेवढे सात्विक राहाल, तेवढे चांगले होईल. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन ईश्वराकडे लावा.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here