Sunday, June 23, 2024

Condoms : वापरलेलं कंडोम फेकायचं कुठे…; कंडोम वापरणं टाळण्यासाठी पुरुष देतात ‘हे’ बहाणे

- Advertisement -

Condoms : अजूनही आपल्या समाजात सेक्स ( sex ) आणि कंडोम ( Condom ) यांच्याविषयी खुलपणाने बोललं जात नाही. सेफ सेक्स ( Safe sex ) म्हणजेच सुरक्षित शारीरिक संबंध ( Physical Relation ) ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणं गरजेचं आहे. कंडोमचा वापर केल्याने अनवॉन्डेट प्रेग्नेंसी आणि सेक्शुअल ट्रान्स्मिटेड डिसीज ( Sexually Transmitted Disease ) रोखता येतात. मात्र भारत देशात आजंही कंडोमचा वापर केला जात नाही. अनेक जणं कंडोमचा वापर करण्यासाठी विविध बहाणे देताना दिसतात. 

कंडोम वापर केल्याने लैंगिक आजारांपासून संरक्षण होते. इतकं होऊनही लोकांना कंडोम वापरायचा नसतो. बरेच लोक याला अनावश्यक खर्च मानतात. सुरक्षित शारीरिक संबंधांबाबत ( Physical Relation ) एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये पुरुष कंडोम वापरण्यासाठी कोणते बहाणे देतात हे समोर आलंय.

पार्टनरची संबंध ठेवण्याची इच्छा होते कमी

आजकाल अनेक पुरुषांचा असं वाटतं कीस जेव्हा ते कंडोम वापरून संबंध ठेवतात, तेव्हा त्यांच्या पार्टनरला त्यात रस नसतो. असा विश्वास आहे की, कंडोम वापरून सेक्स केल्याने त्यांची महिला जोडीदार पूर्णपणे उत्तेजित होत नाही. संशोधनातून असं समोर आलंय की, त्यांच्या पार्टनरला सेक्स करण्याची इच्छा असते, पण कंडोम वापरल्यानंतर त्यांची इच्छा राहत नाही. 

महिला पार्टनर गोळ्यांचा वापर करते

सर्वेक्षणानुसार, अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार, की त्यांची महिला पार्टनर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्यांच्या माध्यमातून नको असलेली गर्भधारणा टाळता येते. मात्र कंडोम केवळ नको असलेल्या गर्भधारणेपासूनच नाही तर अनेक प्रकारच्या लैंगिक संसर्गापासूनही रक्षण करतो. याचशिवाय महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गोळ्या घेण्यापेक्षा कंडोम वापरणं चांगलं असतं.

वापरलेलं कंडोम फेकायचं कुठे?

अनेकांना कंडोम वापरण्यापेक्षा ते फेकून देणं हे मोठं काम वाटतं. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, कंडोम वापरला तर फेकणार कुठे? ते फेकून देण्याची जास्त काळजी वाटते. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, आपल्या समाजात कंडोम वापरणे ही एक अश्लील गोष्ट मानली जाते. घरातील किंवा घराबाहेरील कोणा व्यक्तीने कंडोम फेकताना पाहिलं तर पुरुषांना ती लाजीरवाणी गोष्ट वाटते. मात्र ‘लोक काय म्हणतील’ हा विचार पूर्णपणे थांबवा आणि तुमच्या तसंच पार्टनरच्या सुरक्षेचा विचार करावा.

पार्टनरला आवडत नाही

अनेक पुरुष आपल्या जोडीदाराला कंडोमसोबत सेक्स करायला आवडत नाही असा बहाणा देत असल्याचं समोर आलंय. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पार्टनर त्यांच्यावर कंडोम वापरण्यासाठी दबाव आणत नाहीत. त्यामुळे ते कंडोमचा वापर करत नाहीत. कंडोम वापरणे तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे कोणताही बहाणा देऊ नये. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सर्व्हेक्षणाच्या माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news