Home घर संसार Devshayani Ekadashi 2023 | आषाढी एकादशीला जुळून आलेत 5 शुभ योग, ‘या’ कारणामुळे वाढलाय भगवान विष्णूंचा योगनिद्रा कालावधी

Devshayani Ekadashi 2023 | आषाढी एकादशीला जुळून आलेत 5 शुभ योग, ‘या’ कारणामुळे वाढलाय भगवान विष्णूंचा योगनिद्रा कालावधी

0


lord vishnu yognidra

देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत असतो. मात्र यावेळी चातुर्मासात अधिक मास असेल. त्यामुळे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जवळपास 5 महिने राहतील.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) 29 जूनला आहे. पुराणानुसार या तिथीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, असं मानलं जातं. ही योगनिद्रा चार महिने चालते त्यामुळे तिला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) म्हणतात. मात्र यावेळी भगवान विष्णू (Lord Vishnu Yognidra)अधिक मासामुळे 4 ऐवजी पाच महिने योगनिद्रेमध्ये असतील.

एकादशीला कोणते पाच योग ?
यावर्षी देवशयनी एकादशीला चंद्र स्वाती नक्षत्रात आहे. त्यामुळे स्थिर शुभ योग तयार होत आहे. त्याशिवाय ग्रहांच्या स्थितीमुळे सिद्धी, बुधादित्य, गजकेसरी आणि रवियोगदेखील तयार होत आहेत. या शुभ संयोगात भगवान विष्णूची उपासना आणि व्रताचे शुभ परिणाम जास्त प्रमाणात मिळतात. हा योगायोग स्नान आणि दानाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा मानला जातो.

चातुर्मासात अधिक मास
देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत असतो. मात्र यावेळी चातुर्मासात अधिक मास असेल. त्यामुळे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जवळपास 5 महिने राहतील. परिणामी 29 जून ते 23 नोव्हेंबर या कालावधीत विवाह आणि इतर शुभ कार्य केली जाणार नाहीत. मात्र, पूजा, विधी, नूतनीकरण केलेल्या घरात प्रवेश, वाहन, दागिने खरेदी हे करता येईल.

चातुर्मासात पूजा, व्रत आणि अनुष्ठान करण्याचा सल्ला शास्त्रात देण्यात आला आहे. कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. भजन, कीर्तन, सत्संग आणि भागवत कथा यासाठी चातुर्मास सर्वोत्तम काळ मानला जातो.

देवशयनी एकादशीचं महत्त्व
या एकादशीला सौभाग्यदायिनी एकादशी म्हणतात. पद्मपुराणानुसार या दिवशी व्रत किंवा उपवास केल्याने जाणून-बुजून केलेली पापं नष्ट होतात. या दिवशी पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होते,अशी एक धारणा आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

भागवत महापुराणानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला शंखासुर राक्षसाचा वध झाला होता. त्या दिवसापासून भगवान चार महिने क्षीरसागरात निद्रा घेतात.

सूचना – वरील लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे. या लेखातील कोणत्याही गोष्टीचा आम्ही दावा करत नाही.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here