Sunday, June 23, 2024

Eye Flu Myths : डोळ्यात डोळे घालून बघितल्यास खरंच संसर्ग होतो? येथे वाचा

- Advertisement -

Eye Conjunctivitis In Maharashtra: मुंबई, पुण्यासह राज्यभरात डोळ्यांची साथ आलीये. पावसाळ्यामुळं काही दिवसांपासून राज्यातील काही भागात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ पसरली आहे. यालाच डोळे आले असंही म्हणतात. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो त्याला कॉन्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग झाल्यामुळं डोळे चोळावेसे वाटतात.  डोळ्यांच्या साथीचा संसर्ग पसरला असतानाच एक दावा केला जात आहे. डोळ्यात डोळे घालून पाहिल्यास संसर्ग होऊ शकतो. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया. 

डोळ्यांची साथ कशी पसरते

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार फोफावतात. त्यात डोळे येणे हा प्रमुख आजार आहे. हा आजार फार गंभीर नसला तरी संसर्गजन्य आहे. त्यातच डोळ्यांसारखा नाजून भागावर परिणाम होत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. जंतू किंवा बॅक्टेरिया, विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत. डोळ्यांचा संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो व्हायरसमुळं होतो. 

डोळ्यात डोळे घालून बघितल्यास संसर्ग होतो

डोळ्यांना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बघितल्यास समोरच्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो. असा दावा केला जातो. मात्र या दाव्यात काही तथ्य नाहीये. संसर्ग झालेल्या व्यक्तींनी वापरलेले रुमाल किंवा टॉवेल वापरले तरच संसर्ग पसरु शकतो. पण संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहणे हे संक्रमणाचे साधन नाहीये. जेव्हा एखाद्या संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणाऱ्या स्त्रावाच्या संपर्कात आला तरच त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. 

डोळे येण्याची लक्षणे काय?

डोळे लाल होणे

डोळ्यांच्या कडा लाल होणे 

पापण्या एकमेकांना चिकटणे

डोळ्यातून सतत पाणी येते

डोळ्यांना सूज येते

डोळे सतत चोळावेसे वाटतात
 
डोळ्यातून पिवळसर द्रव येत राहतो

सतत डोकेदुखी राहते

डोळे आल्यावर तातडीचे काय उपाय कराल

डोळ्यावर थंड पाण्याचा सतत हबका मारणे

पाण्याने डोळ्यात साठणारा मळ स्वच्छ करत राहा

डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवावेत

डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे वा रुमाल वापरु नयेत.

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news