Home Blog Fruits For Blood Purification | रक्त शुद्धीकरणासाठी ‘ही’ फळं खा, आरोग्य राहिलं उत्तम!

Fruits For Blood Purification | रक्त शुद्धीकरणासाठी ‘ही’ फळं खा, आरोग्य राहिलं उत्तम!

0
Fruits For Blood Purification | रक्त शुद्धीकरणासाठी ‘ही’ फळं खा, आरोग्य राहिलं उत्तम!


avoid fruits after meal

सफरचंदामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात फायबरची चांगली मात्रा असते, ज्यामुळे ते पचन सुधारण्यास आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवण्यात रक्ताची विशेष भूमिका असते. म्हणूनच शरीरातील रक्त अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे. परंतु आपण सर्वजण असे काही पदार्थ खातो किंवा पितो, ज्यामुळे आपले रक्त प्रदूषित होते किंवा शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. रक्तामध्ये असलेली घाण केवळ तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करत नाही तर अनेक गंभीर आरोग्य समस्यांना देखील आमंत्रण देते. अशा काही पदार्थांबद्दल ज्यामुळे तुमचे रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होऊ शकते. (Fruits For Blood Purification )तुमचे शरीर डिटॉक्स करण्याचे काम किडनी करत असते. जास्त पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे दिवसातून किमान २ ते ३ लिटर पाणी पीत जा.

सफरचंद खा

सफरचंदामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात फायबरची चांगली मात्रा असते, ज्यामुळे ते पचन सुधारण्यास आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. डॉक्टर देखील दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे अनेक आजार दूर होतील.

कॉफी प्या

कॉफीचे सेवन केल्याने यकृताचे कार्य सुधारते, जे रक्त स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, कॉफी पिण्याचा अतिरेक देखील करू नका. नाहीतर त्याचे दुष्परिणाम देखील उद्भवतील. दिवसातून एकदा कॉफी पिणं निरोगी आरोग्यासाठी चांगलं आहे.

ग्रीन टी प्या

ग्रीन टी पिणे शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात त्यामुळे यकृत निरोगी राहते. तसंच हे रक्तातील अतिरिक्त चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवते.

आले चहा

शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे आल्याचा चहा घेणे. तुम्ही दिवसातून २ ते ३ कप आल्याचा चहा पिऊ शकता. याने तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. तसंच तुम्ही ताजेतवाने देखील राहाल.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here