Sunday, June 23, 2024

High cholesterol : शरीरात ‘हे’ 4 बदल दिसल्यास समजा रक्तामध्ये वाढलंय कोलेस्ट्रॉल

- Advertisement -

Signs of high cholesterol : प्रत्येकाची इच्छा असते की, आपण फीट आणि फाईन रहावं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ( Healthy Heart ) ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तींला व्यायाम ( Exercise ) करणं शक्य होत नाही. अशातच चुकीच्या आहारामुळे कमी वयातच लोक कमी वयातच अनेकांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची ( high cholesterol ) समस्या दिसून येतेय.

कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकसोबत ( Heart Attack ) स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. यामध्ये एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं वाईट कोलेस्ट्रॉल ( high cholesterol ). आपल्या शरीरात ज्यावेळी वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा काही संकेत दिसून येतात. जाणून घेऊया हे संकेत काय असतात?

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात ‘हे’ 5 बदल

  • शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे जर सतत तुम्हाला तुमचं डोकं जड वाटत असेल तर हे  कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं.
  • जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा सतत श्वास फुलू लागला तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
  • जर तुम्हाला अचानक तुमचं वजन वाढलेलं वाटत असेल तर हे देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. यामुळे तुम्हाला सतत थकवा देखील जाणवू शकतो.
  • छातीत अचानक भरपूर वेदना होणं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षणं असू शकतं.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असल्यास आहारात या पदार्थांचा समावेश करा

ओट्स ( oats )

उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर ओट्स फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये बीटा ग्लुकन असते जे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.

अक्रोड ( walnut )

कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3, फायबर, कॉपर आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटक अक्रोडमध्ये असतात. त्यामुळे अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वितळण्यास सुरुवात होते. 

लिंबू ( lemon )

व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतं. लिंबूवर्गीय फळांमध्ये काही फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉलला रक्तात जाण्यापासून रोखते. 

लसूण ( garlic )

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण प्रभावी ठरते. अनेकदा संशोधनातून असं दिसून आलंय की, दररोज लसूण खाल्ल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी 9 ते 15 टक्क्यांनी कमी होते.

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news