Home घर संसार Holi Celebration In Different Places | वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे साजरी केली जाते होळी, जाणून घ्या काय आहे खास

Holi Celebration In Different Places | वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे साजरी केली जाते होळी, जाणून घ्या काय आहे खास

0
Holi Celebration In Different Places | वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे साजरी केली जाते होळी, जाणून घ्या काय आहे खास


वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे साजरी केली जाते होळी, जाणून घ्या काय आहे खास

भारतातील विविध शहरांमध्ये होळी वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्यात येते.

होळीचा सण सहा दिवसांवर आला आहे. हा रंगाचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाा आवडतो. काहींना फक्त कोरड्या रंगाची होळी खेळायला आवडते तर कुणी त्या कोरड्या रंगात पाणी मिसळून ओला रंग लावून होळी खेळतात. ज्याप्रमाणे व्यक्तिपरत्वे होळी खेळण्याची पद्धत वेगळी आहे त्याप्रमाणे आपल्या देशातही वेगवेगळ्या शहरांमध्ये होळी वेगवेगळ्या प्रकारे (Holi Celebration In Different Places) साजरी केली जाते. अनेक ठिकाणी रंगांनी तर काही ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते. काठ्या मारून होळी साजरी करण्याचे ठिकाणही आहे. चला तर जाणऊ घेऊया भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होळी कशी साजरी केली जाते.

लठमार होळी

उत्तर भारत, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये होळी मोठ्या प्रमाणावर खेळली जाते. होलिका दहनापासूनच लोक रंग खेळायला लागतात. या संदर्भात, बरसाणाची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी नांदगावचे हुऱ्या आपल्या ढालीसह बरसाणा येथे जातात आणि बरसाणाच्या गोपी काठ्या घेऊन होळी खेळतात.

मेदुरु होळी

दक्षिणेकडील आंध्र प्रदेश राज्यात होळी ‘मेदुरु होली’ म्हणून साजरी केली जाते. या काळात मिरवणुका काढल्या जातात ज्यात लोक उत्साहाने सहभागी होतात. या वेळी पारंपारिक संगीत आणि नृत्यासोबत एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते.

मांजल कुळी

कोकणी आणि कुडूंबी समाज हा सण शांततेत साजरा करतात. या वेळी लोक मंदिरांना भेट देतात आणि लोकगीते आणि जलरंगांसह उत्सव साजरा करतात. या रंगांची खास गोष्ट म्हणजे ते हळदीपासून बनवले जातात.

उदयपूर

उदयपूरच्या शाही शहरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होलिका दहनाच्या संध्याकाळी, होलिकेच्या पुतळ्याचं दहन  केलं जातं आणि नंतर शाही बँडसह घोड्यांची भव्य मिरवणूक काढली जाते.

दिल्लीची होळी

दिल्लीतील होळी खरोखर पाहण्यासारखी आहे. येथे होळीच्या उत्सवात लोक मोठ्या आवाजात गाण्यांवर नाचतात आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. दिल्लीतही अनेक ठिकाणी होळीच्या पार्ट्या होतात, त्या पाहण्यासारख्या असतात.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here