Home Blog International Yoga Day | चाळीशीतही सुंदर दिसायचं, ते सुद्धा चेह-यावर कोणतीही ट्रीटमेंट न करता ! घरच्या घरी करा ‘फेस योगा’….तेजस्वी दिसा

International Yoga Day | चाळीशीतही सुंदर दिसायचं, ते सुद्धा चेह-यावर कोणतीही ट्रीटमेंट न करता ! घरच्या घरी करा ‘फेस योगा’….तेजस्वी दिसा

0


चाळीशीतही सुंदर दिसायचं, ते सुद्धा चेह-यावर कोणतीही ट्रीटमेंट न करता ! घरच्या घरी करा ‘फेस योगा’….तेजस्वी दिसा

फेस योगा चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत करतो. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही तो उपयोगी ठरतो. तणाव, काळजीमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग, सुरकुत्या निघून जातात. त्यामुळे चेहरा हा तणावमुक्त दिसतो. त्वचारोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फेस योग हा एक चेहऱ्याचा व्यायाम आहे. ज्यामध्ये चेहऱ्याचे रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी आणि लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारण्यासाठी चेहऱ्याला टोन करतात.

आपलं शरीर बेडप दिसू नये; स्लीम दिसावं म्हणून आपण व्यायाम करतो, योगसाधना करतो. धावतो,चालतो,खेळतो हे सगळं करतो. मात्र, आपलं मन आपला चेहरा हा टवटवीत दिसावा यासाठी आपण महागडे प्रोडक्ट वापरतो आणि चेहरा तेजस्वी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा चेहरा दोन-तीन दिवस अगदी सुंदर,सॉफ्ट वाटतो. मग, पुन्हा त्यावर प्रदूषणाचा आणि तेलकट थर जमा झाला की, चेहरा निस्तेज व्हायला सुरूवात होते. असं म्हणतात चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो. आपल्या मनातील भाव चेह-यावर सहज उमटून जातात. अशा या तुमच्या लाडक्या चेह-याची काळजी कशी घ्यायची? चेह-यावर मसाज का करायचा? फेस योगा केल्याने किती फायदा होतो हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत…जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर…

फेस योगाचे फायदे

वयानुसार त्वचेमधील कोलेजीनची निर्मिती कमी होत जाते. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सैल होत जाते. याचा परिणाम चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स, डार्क सर्कल्स असे एजिंग मार्क्स दिसू लागतात. एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी आजकाल बाजारात विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने मिळतात. परंतु अशा महागड्या ट्रिटमेंट अथवा प्रॉडक्टचा वापर करण्याआधी तुम्ही काही सोपे फेस योगा करु शकता. या योगामुळे घरच्या घरी सहज तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा आणि स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते.

चेह-याचे व्यायाम करताना, किंवा चेह-याला मसाज करताना बदामाचं तेल आणि कुंकुंमादी तेलाचा जरूर वापर करावा. यामुळे चेह-यावरील काळे डाग, वांग तसंच डोळ्याच्या भोवताली असलेली काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत होते. बदामाच्या तेलाने त्वचा मुलायम राहते.

कुठल्याही फंक्शनला जाण्याआधी फेसयोगा केल्यास कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही. फेस योगामुळे तुमच्या चेह-यावर आलेला ताणतणाव कमी व्हायला मदत होते. साधारण चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. तिच्या स्वभावात आलेला चिडचिडेपणा दूर करण्यासाठी अशा विविध उपायांनी नवी उर्जा मिळते.

फेसयोगाचे प्रकार

चिन लिफ्ट पोझ (Chin Lift Pose)

योगासनांचा सराव करताना वार्म अप पोझिशन म्हणजेच पूर्वतयारीसाठी तुम्ही ही पोझ करू शकता. यामध्ये तुम्हाला ताठ उभे राहत चेहरा वर करत आकाशाकडे पाहायचे असते. त्यानंतर आकाशाचे चूंबन घेतल्याप्रमाणे ओठ आणि चेहऱ्याची हालचाल करत हे आसन करायचे आहे. दोन ते पाच वेळा तुम्ही ही हालचाल करून पुढील आसनाकडे वळू शकता.

चिन लॉक पोझ (Chin Lock Pose)

डबल चिन कमी करण्यासाठी हे खूपच उपयुक्त फेस योगाआसन आहे. कारण यात जालंधर बंध बांधला जातो ज्यामुळे चेहरा आणि जबड्यावर चांगला ताण येतो. यासाठी सुखासनात बसा आणि हात गुडघ्यांवर ठेवा. तुमची हनुवटी छातीकडे नेत मान खाली झुकवा. ज्यामुळे हनुवटी लॉक केल्याप्रमाणे पोझिशन तयार होईल. यामुळे तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारेल.

हे सुद्धा वाचा

फिश पोझ (Fish pose)

फेस योगाच्या या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचे ओठ आणि गाल तोंडात ओढून घेत ओठांचा चंबू करायचा असतो. ज्यामुळे तुमच्या तोंडाचा आकार माशाप्रमाणे दिसू लागतो. काही सेंकद या पोझिशनमध्ये स्थिर राहत तुम्ही पुन्हा तुमचा चेहरा पूर्ववत करायचा असतो. दिवसातून एक ते दोन वेळा या पोझिशनचा सराव तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुमच्या गाल, जबडा आणि ओठांचे स्नायू मजबूत होतात.

लायन पोझ (Lion pose)

लायन पोझ करण्यासाठी तुम्ही योगा मॅटवर वज्रासनात बसा शकता. यानंतर हात गुडघ्याजवळ नेत जमिनीवर टेकवायचे असतात. तुमची शारीरिक स्थिती एखाद्या बसलेल्या सिंहाप्रमाणे होते. त्यानंतर जीभ बाहेर काढत घशातून बाहेर तोंडातील हवा सोडत आवाज करायचा असतो. सिंहाच्या गर्जनेप्रमाणे हा आवाज असतो.

 

माऊथ वॉश पोझ (Mouthwash Pose)

फेस योगामधील हा एक सोपा प्रकार आहे. यासाठी तुम्हाला तोंडात पाणी घेऊन चूळ भरल्याप्रमाणे करायचे आहे. तोंडात फक्त हवा भरून चूळ भरल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करायची असते. दोन ते तीन वेळा असा सराव केल्यास तुमच्या गाल आणि हनुवटी खालील चरबी कमी होण्यास मदत होते.

 Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here