Home Blog International Yoga Day | योग दिनानिमित्त सेलिब्रिटींच्या योगा पोस्ट….पण,सर्वाधिक चर्चेत राहीली ‘त्या’ सेलिब्रिटींच्या मुलांची योगा पोझ…उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या योगावर कमेंटचा वर्षाव

International Yoga Day | योग दिनानिमित्त सेलिब्रिटींच्या योगा पोस्ट….पण,सर्वाधिक चर्चेत राहीली ‘त्या’ सेलिब्रिटींच्या मुलांची योगा पोझ…उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या योगावर कमेंटचा वर्षाव

0


योग दिनानिमित्त सेलिब्रिटींच्या योगा पोस्ट….पण,सर्वाधिक चर्चेत राहीली ‘त्या’ सेलिब्रिटींच्या मुलांची योगा पोझ…उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या योगावर कमेंटचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेलेब्रिटींच्या सोशल मीडियावर योगा पोझेस…योगाने आत्मशांती लाभते असं म्हणत रोज योगा करा…तंदुरूस्त राहा असा संदेश सेलिब्रिटींनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.

International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, यानिमित्त दोन छोट्या सेलिब्रिटींनी सब का मन जीत लिया….हे दोन सेलिब्रिटी म्हणजे, दुसरे तिसरे कोणी नसून तैमूर आणि जहांगीर सैफ अली खान आहेत…डॅडी सैफसोबत त्यांनीही या योग दिनाला योगासन करून सर्वांनाच आर्श्चर्याचा धक्का दिला. डॅडी सैफसोबत योग करतानाचा हा फोट सध्या व्हायरल होत आहे. (saif ali khan) (kareena kapoor khan)

 

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान(kareena kapoor khan) आपल्या फिटनेससाठी खूपच लोकप्रिय आहे. करिना आपल्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ नेहमीच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

मलायका अरोरा (Malaika arora) ही तिच्या फिटनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे. वयाच्या 50 व्या वर्षी ही फिट आहे. जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ शेअर करत This is my point of view. What is yours?

 

करिना,मलायका आणि शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) ही देखील आपल्या फिटनेस आणि रोजच्या योग साधनेसाठी प्रसिद्ध आहे. व्यायाम,योगामुळे मनाला आनंद मिळतो असं तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. “व्यक्तीने आतून आनंदी असणे आवश्यक आहे… निरोगी मन, शरीर आणि आत्म्यासाठी योगाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा.जसं म्हणतात,ना निरोगी व्यक्ती ही आनंदी व्यक्ती आहे”.

या अभिनेत्रींप्रमाणेच नेहमी चर्चेत असलेलं नाव म्हणजे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) त्यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला. (International Yoga Day 2023)या पोस्टमध्ये त्यांनी ” आप कितने भी व्यस्त हो,दुनिया के किसी भी कोने में हो, तन और मन से सेहतमंद रहने के लिए – एक चटाई बिछाकर योग करना ना भूलें!!! असा संदेश देत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

 

 Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here