Sunday, June 23, 2024

Laxmi Narayan Rajyog 2023 | गुरुपौर्णिमेला जुळून आलाय लक्ष्मी नारायण राजयोग, ‘या’ राशींना होणार फायदा

- Advertisement -


laxminarayan rajyog

लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव गुरुपौर्णिमेपासूनच सुरु होणार आहे.

जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग (Laxmi Narayan Rajyog 2023) तयार होणार आहे. बुध शुक्राच्या युतीने तयार होणारा हा लक्ष्मी नारायण राजयोग हा संपत्ती वाढीसाठी खास मानला जातो. लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव आज गुरुपौर्णिमेपासूनच (Gurupaurnima) सुरु होणार आहे. गुरु पौर्णिमेला ब्रह्म, इंद्र व बुधादित्य असे तीन बलाढ्य राजयोग तयार झालेे आहेत. अशातच मिथुन राशीत स्थिर असलेल्या बुध ग्रहावर सिंह राशीत प्रवेशासाठी निघालेल्या शुक्राचा प्रभाव वाढू शकतो. याच ग्रह संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊयात.

मेष रास
लक्ष्मी नारायण राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना फायदा होतो. तुम्हाला वाहन वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचा योग आहे. मेष राशीच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी राजयोग तयार झाला आहे. यामुळे रिअल इस्टेट, स्वतःचा व्यवसाय, राजकारण या तीन प्रमुख क्षेत्रातील मंडळींना फायदा होऊ शकतो. भौतिक सुखाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ झाल्याने अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याचं बळ मिळू शकतं. नोकरदार मंडळींनी विवेक हरवू देऊ नये.

कन्या रास
लक्ष्मी नारायण योग कन्या राशीच्या गोचर कुंडलीत मिळकतीच्या केंद्रावर तयार होतोय. आपल्या धनसंपत्तीत वाढ करणारे स्रोत त्यामुळे येत्या काळात वाढू शकतात. नवीन मार्गांसह जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा मिळू शकतो. या काळात आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे आर्थिकच नव्हे तर भावनिक दृष्टीने सुद्धा तुम्ही समृद्ध होऊ शकता. शेअर बाजारात फायदा होऊ शकतो.

मकर रास
मकर राशीच्या गोचर कुंडलीत धन स्थानी लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. तुम्हाला अडकून पडलेले धन पुन्हा मिळू शकते. विवाहयोग आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्नशील असल्यास लवकरच मुलाखतीची संधी आहे. जोडीदाराचे सुख प्राधान्याने जपल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भागीदारीच्या कामातून फायद्याचे संकेत आहेत. तुमच्या संवाद कौशल्यावर भर देऊन अनेक कामे पूर्ण होतील. मीडिया, मार्केटिंग, शिक्षण या क्षेत्रातील मंडळींना लाभाचे संकेत आहेत.

तूळ रास
लक्ष्मी नारायण योग तूळ राशीच्या कुंडलीत कर्म स्थानी तयार होत आहे. यामुळे येत्या काळात तुम्हाला मेहनतीपासून सुटका नाही पण केलेल्या प्रत्येक कामाचे दुप्पट फायदे मिळू शकतात. व्यावसायिक व नोकरदार दोन्ही वर्गासाठी हा काळ फायद्याचा ठरू शकतो. नवीन संपर्क जोडले जातील. त्यातून तुम्हाला गुंतवणूक व धनप्राप्तीचे संकेत आहेत.

सूचना – वरील लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आलेला आहे. त्यातील कोणत्याही तथ्यांचा आम्ही दावा करत नाही.Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news