Home वाहन विशेष Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल

Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल

0
Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल

Mahindra E-alfa Super: महिंद्रा कंपनीने एक नवीन ई-रिक्षा लाँच केली आहे.  Mahindra e-Alfa Super असं या थ्री व्हिलरचे नाव आहे. भारतात ई-रिक्क्षाचे मार्केट अॅडव्हान्स बनवण्यासाठी महिंद्राने ही रिक्क्षा बाजारात दाखल केली आहे. ई अल्फा सुपर हे एक युटिलिटी वाहन आहे. हे इलेक्ट्रिक मोटरवर काम करते. तीनचाकी वाहने म्हणजेच रिक्षा भारतात वाहतूक व्यवस्थेचा एक भाग म्हणून दीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत. शहरांमध्ये खाजगी आणि राइड-शेअरिंगसाठी रिक्षाचा वापर केला जातो. यासह मालवाहतूक म्हणून देखील रिक्षाचा वापर केला जातो.

महिंद्रा ई-अल्फा सुपरची एक्सची शोरूम किंमत 1.61 लाख रुपये आहे. ही रिक्षा लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे

महिंद्रा ई-अल्फा सुपरमध्ये 140Ah लीड-ऍसिड बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये दिलेली इलेक्ट्रिक मोटर 1.64kW पॉवर आणि 22Nm टॉर्क जनरेट करते. रेंजबद्दल बोलायचे झाले तर, अॅडव्हान्स महिंद्रा ई-अल्फा एकादा चार्ज केल्यानंतर जवळपास 95 किमीपर्यंतचे अंतर पार करते.  यासोबतच ई-अल्फा सुपरमध्ये 18A चार्जर उपलब्ध आहे. 

महिंद्र चार्जरसह 12 महिन्यांची गॅरटी आणि बॅटरीसह 18 महिन्यांची वॉरंटी देखील देत आहे. महिंद्राची भारतात 10,000 हून अधिक चार्जिंग स्टेशन्स आहेत, जेणेकरुन E-Alfa Super ला चार्ज करणे सहज शक्य होणार आहे. महिंद्राची भारतभरात EV ला सपोर्ट करणारी 1,100 हून अधिक सेवा केंद्रे आहेत.

महिंद्रा ई-अल्फा सुपरची निर्मिती महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीने केली आहे. महिंद्रा ई-अल्फा थ्री-व्हीलर सर्वोत्तम श्रेणीतील सुरक्षितता देते त्याचबरोबर प्रवाशांना आरामदायी प्रवासदेखील करता येणार आहे. ई-अल्फा पेक्षा ई-अल्फा सुपर मजबूत आणि अधिक टिकाऊ आहे. 

दरम्यान, महिंद्रा ई-अल्फा सुपर लाँच झाल्यानंतर 50 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ई-अल्फा सुपरचा वापर राइडिंग आणि माल वाहून नेण्यासाठी दोन्हीसाठी केला जाऊ शकतो.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here