Sunday, June 23, 2024

Rapid Weight Gain: योग्य आहार घेऊनही वजनात होतेय वाढ? सावधान, पहिल्यांदा ‘या’ मेडिकल टेस्ट करून घ्या, अन्यथा…

- Advertisement -

Rapid Weight Gain: सध्या चुकीची जीवनशैली ( Wrong Lifestyle ) आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी ( Diet ) यांच्यामुळे अनेक समस्या लोकांमध्ये दिसून येतात. यातीलच एक समस्या म्हणजे वजन वाढीची. बेली फॅट ( Belly Fat ) वाढणं, हिप फॅट वाढणं या तक्रारी आता तरूणांमध्येही दिसून येऊ लागल्यात. वजन किंवा फॅट कमी करण्यासाठी डाएट आणि जीमची मदत घेतली जाते. मात्र असं असूनही अनेकांचं वजन काही कमी होत नाही उलट ते अधिक वाढू लागतं.

जर तुम्हाला देखील हीच समस्या जाणवत असेल तर सावधान व्हा, कारण हे एखाद्या आजाराचं लक्षण असून शकतं. जर डाएट करून देखील तुमच्या वजनात वाढ होत असेल तर तुम्ही काही वैद्यकीय टेस्ट करून पाहिल्या पाहिजेत. जाणून घेऊया या टेस्ट कोणत्या आहेत. 

थायरॉईड (Thyroid Function Test)

थायरॉईडच्या ग्रंथी चयापचयक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. जर थायरॉईडच्या ग्रंथी अकार्यक्षम असेल तर यामुळे चयापचय मंद होऊ शकते. ही क्रिया मंद झाल्यानंतर व्यक्तीच्या वजनात वाढ होऊ लागते. हायपोथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी योग्य आहार घेऊनही वजन वाढू शकते. असं असल्यास थायरॉईड फंक्शन टेस्ट जसं की, थायरॉईड उत्तेजक संप्रेरक (TSH) आणि थायरॉक्सिन (T4) पातळी यांच्या टेस्ट करून घेणं फायदेशीर ठरेल.

इन्सुलिन प्रतिरोध (Glucose Tolerance Test)

जेव्हा शरीरातील पेशी इंसुलिनला कमी प्रतिसाद देतात तेव्हा इन्सुलिनचा प्रतिकार होतो, आणि परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. ज्यावेळी एखाद्या रूग्णाला ही परिस्थितीत उद्भवते, त्यावेळी शरीरामध्ये फॅट जमा होण्याची प्रक्रियेला देखील वेग येतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही चांगला आहार घेऊनही वजन वाढत असेल तर GTT चाचणी करून घ्यावी. यामुळे शरीर ग्लुकोजच्या सेवनास कसा प्रतिसाद देते हे निर्धारित करू शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलतेचे मूल्यांकन करू शकते. 

हार्मोन पॅनल (Hormone Panel Test)

आपली चयापचय क्रिया, भूक लागणं यांच्यामध्ये हार्मोन्सची भूमिका फार महत्त्वाची असते. कॉर्टिसोल, लेप्टिन, घरेलीन आणि सेक्स हार्मोन्स यांसारख्या हार्मोन्समधील असंतुलन वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. यामुळे शरीरात चरबी जमा होते. त्यामुळे अशा वेळी एक हार्मोन पॅनेल कोणत्याही हार्मोनल असंतुलनाबद्दल माहिती देऊ शकते. त्यामुळे ही टेस्ट देखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

फूड सेंसिटिविटी टेस्ट

काही प्रकरणांमध्ये, वजन वाढणं हे फूड सेंसिटीव्हिटीमुळे असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अन्नाची संवेदनशीलतेमुळे वजन वाढणे, पोट फुगणे आणि पाणी टिकवून ठेवण्यास कारणीभूत ठरू शकते. अशावेळी काही काळासाठी एखाद्या व्यक्तीच्या वजनात वाढ होऊ शकते. त्यामुळे योग्य आहार घेऊनही वजन वाढीची समस्या दिसून येत असेल तर ही टेस्ट करून घ्यावी.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

 

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news