Sunday, June 23, 2024

Shradh 2023 | श्राद्ध म्हणजे ऋणमुक्ती

- Advertisement -


shradh

जे हयात नाहीत त्यांना आठवण करत आहोत, पण जे आज आहेत. त्यांच्याबरोबरचा आपला व्यवहार नीट ठेवण्याकडेही लक्ष द्यावे. आज एखादी सून आपल्या सासूला जिवंत असताना ठीक खाऊ घालत नसेल, तिला चुकीची वागणूक देत नसेल. समजा काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. मग जेव्हा श्राद्धाचे दिवस आले, त्यावेळी नानाविध पदार्थ बनवले तर त्याला काही अर्थ नाही. जे जिवंतपणी केले नाही ते मरणानंतर करत राहिलो त्याचा उपयोग नाही. म्हणून सर्वांना माझ्याकडून कसे सुख मिळू शकेल यावर नक्कीच विचार करावा.

भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपरिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास… या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध. या पंधरा दिवसांमध्ये आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आठवून त्यांना जे आवडायचे ते खाऊ घालतो. याच्या पाठीमागची भावना खूप चांगली आहे पण एक प्रथा म्हणून त्याचे पालन न करता, श्रद्धेने ते कार्य जरूर करावे. श्रद्धेने केलेल्या प्रत्येक कार्याची सिद्धी जरूर मिळते.

या प्रथेपाठीमागचे गूढ जाणून घेतले ते त्या कार्याचे समाधान आपल्याला मिळेल. आज ज्या कुटुंबामध्ये आपला जन्म झाला, त्या प्रत्येक सदस्याबरोबर आपली कर्मांची बंधने बांधली गेली आहेत. सुख-दुःखाचे काही पाश बांधले आहेत. ते ऋण आहेत, ते आपल्याला फेडवेच लागतात. त्यातून सहजा सहजी सुटका होत नाही. आज जे आपल्यासोबत नाहीत त्यांना आपण आठवतो, शरीराला डोळ्यासमोर आणतो. पण जे भोजन बनवले जाते ते खाण्यासाठी ती व्यक्ती येऊ शकते? ते शरीर तर मातीत मिसळून गेले. म्हणजेच आपण शरीराला नाही पण त्या आत्म्याला बोलावतो. ती चेतना जिच्यामध्ये आपले प्रकम्पन कॅच (catch) करण्याची शक्ती आहे. आत्म्याला तृप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो. आत्म्याचे अस्तित्व आजही आहे हे आपण जाणतो. एखाद्याचा मृत्यू निकट असेल तर आपण त्याला त्याची अंतिम इच्छा काय आहे ते विचारतो. कारण इच्छा अपूर्ण राहिली तर त्यांना तसेच आपल्यालाही त्रास होतो. या जन्माच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर पुढचा प्रवास चांगला होईल ही त्यापाठीमागची भावना असते. त्यांची इच्छा अपूर्ण राहण्याचे कारण आपण न बनावे याची काळजी घेतो व ती काळजी नक्कीच घ्यावी. कारण आत्म्याशी जोडलेले कर्मबंधन हे आजचे नव्हे पण जन्मोजन्मीचे आहेत. आपण ऐकले असेल काहींच्या पत्रिकेमध्ये पित्रदोष असतो त्यामुळे जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हा पित्रदोष म्हणजेच कुटुंबातील सदस्यांना दिलेले दु:खे आपल्यावर ओढवतात व जीवनाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात. म्हणून या दिवसांमध्ये त्यांना प्रेमाने आठवण करून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागून आपली श्रद्धा अर्पण करावी.

जे हयात नाहीत त्यांना आठवण करत आहोत, पण जे आज आहेत. त्यांच्याबरोबरचा आपला व्यवहार नीट ठेवण्याकडे हि लक्ष द्यावे. आज एखादी सून आपल्या सासूला जिवंत असताना ठीक खाऊ घालत नसेल, तिला चुकीची वागणूक देत नसेल. समजा काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. मग जेव्हा श्राद्धाचे दिवस आले, त्यावेळी नानाविध पदार्थ बनवले तर त्याला काही अर्थ नाही. जे जिवंतपणी केले नाही ते मरणानंतर करत राहिलो त्याचा उपयोग नाही. म्हणून सर्वांना माझ्याकडून कसे सुख मिळू शकेल यावर नक्कीच विचार करावा. मनुष्य शेवटी काय घेऊन जाणार आहे? आज धन, पद, संपत्ती… ज्याच्यापाठी आपण आपली शक्ती, वेळ, खर्च करत आहोत ते सर्वच सोडून द्यावे लागणार. बरोबर फक्त कर्म आणि संस्कारांचे गाठोडे असेल जे अदृश्य आहे. त्याची कमाई किती केली हे जरूर पाहावे. रोजच्या कार्य व्यवहारामध्ये माझ्याकडून काही पुण्य व्हावे यावर एक नजर जरूर असावी. हे दिवस भूत आणि भविष्य दोघांचे दर्शन करण्याची प्रेरणा देतात. एक दिवस आपल्याला सुद्धा जायचे आहे म्हणून कर्मांचे बँक बॅलन्स (balance) चेक करा. लोक मला कशाप्रकारे आठवण करतील? जसे कोणी खूप चांगल्या स्वभावाचा असेल तर त्याच्यासाठी आपण बोलतो कि ‘खूप चांगले होतो, आम्हाला खूप सुख देऊन गेले’. पण तेच एखाद्याने खूप त्रास दिला असेल तर त्याच्यासाठी म्हणतो की, ‘बरे झाले गेले, एकदाची सुटका झाली’. आपल्यासाठी लोक काय बोलतील ते आपणच समजावे.

जे आपल्याला मिळाले त्याचे जबाबदार आपण स्वतः आहोत याचा स्वीकार करावा. माझ्यामुळे कोणाला दु:ख तर होत नाही, कोणाचे नुकसान तर करत नाही … याची तपासणी रोज करावी. लहानपणी शिकवले जायचे कि कोणाचे भले नाही करू शकले तरीही चालेल पण कोणाचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी. या एका धारणेनेसुद्धा आपल्याकडून कमी चुका होतील. श्राद्धाच्या या दिवसांचे रहस्य समजून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनावा, श्रेष्ठ कर्मांची पुंजी जमा व्हावी हीच सर्वांसाठी शुभभावना.

– नीता बेनSource

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news