Home घर संसार Super Moon 2023 | वर्षातल्या पहिल्या सुपरमूनचं आज होणार दर्शन? का म्हणतात याला बक मून? जाणून घ्या

Super Moon 2023 | वर्षातल्या पहिल्या सुपरमूनचं आज होणार दर्शन? का म्हणतात याला बक मून? जाणून घ्या

0


supermoon

बक मून किंवा सुपर मून जुलै महिन्यात दिसतो. पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तो त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो.

खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी चार वेळा सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. या चार पैकी पहिलं सुपरमून जुलै महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच आजच दिसणार आहे. जर वातावरण नीट असलं तर कोणत्याही वैज्ञानिक उपकरणाशिवाय सुपरमून पाहता येणार आहे.(Super Moon 2023)

आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. आज आकाशात दिसणाऱ्या चंद्राला बक मून (Buck Moon), थंडर मून किंवा सुपरमून (Super Moon) असं म्हणतात. बक मून म्हणजे काय ते जाणून घेऊयात.

बक मून ( Buck Moon)
बक मून किंवा सुपर मून जुलै महिन्यात दिसतो. पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तो त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो. 3 जुलै 2023 रोजी म्हणजेच आज बक मूनचे सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्य संपूर्ण जगभरात दिसेल. जून-जुलै महिन्यात नर हरणांची शिंगे खूप वेगाने वाढतात आणि या काळात त्यांचा आकार सर्वात मोठा असतो. नासाच्या मते, ‘बक मून’ हे नाव द मेन फार्मर्स पंचांगावरून देण्यात आले आहे. याला ‘थंडर मून’ असंही म्हणतात, कारण या महिन्यात गडगडाटासह पाऊस पडतो. भारतात याला ‘आषाढ पौर्णिमा’ किंवा ‘गुरु पौर्णिमा’ म्हणतात. महर्षी वेद व्यास जयंतीदेखील या दिवशी साजरी केली जाते.

ग्रहण तज्ञ आणि नासाचे निवृत्त खगोलभौतिकशास्त्रज्ञ फ्रेड इस्पानक यांनी सांगितलं की, सुपरमूनच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वात जवळ असतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्र मोठा आणि चमकदार दिसतो. आज दिसणारा सुपरमून चंद्रापासून 3,61 184 किमी अंतरावर असेल. सामान्यत: पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3, 84 400 किमी असेल.Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here