Home bollywood VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

0
VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

Koffee With Karan Kriti Sanon : काल 24 ऑगस्ट रोजी 69 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या दोघींना हा विभागून पुरस्कार मिळाला आहे. आलियाला हा पुरस्कार तिच्या गंगुबाई या चित्रपटासाठी मिळाला तर दुसरीकडे क्रिती सेननला हा पुरस्कार मिमि या चित्रपटासाठी मिळाला आहे. त्या दोघींना हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा जशी झाली त्यानंतर ‘कॉफी विथ करण 7’ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 ‘कॉफी विथ करण 7’ मधील क्रिती सेननचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत करण त्याच्या समोर असलेल्या क्रिती सेननला प्रश्न विचारला की कधी तिला तिच्या आजूबाजूला असलेल्या कलाकारांची इर्शा असण्यावर काय विचारत करते? तुला कधी असं वाटतं का की अशा रुपात मला स्वत: ला पाहायचं आहे. त्याशिवाय आलिया भट्ट पेक्षा चांगलं काम करणं  किंवा इतर अभिनेत्रींपेक्षा चांगलं काम करण? जसं की आलिया ही देशातली सर्वोत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची सतत चर्चेत असते. तर तू या गोष्टीला स्वीकारतेस किंवा ही गोष्ट तुला तिथपर्यंत पोहोचवण्यास प्रेरित करते? 

करणनं विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देत क्रिती सेनन उत्तर देते की जेव्हा कधी मी चांगलं काम बघते तेव्हा मला खरंच असं वाटतं की यामुळे मी प्रेरित होते आणि मला याहून आणखी चांगल काम करण्याची आकांशा मिळते. क्रिती असं बोलत असताना करण मध्येच तिला थांबवत बोलतो उदा. गंगुबाई? त्यावर उत्तर देत क्रिती बोलते हो, आणि तुम्हालाही माहित आहे की मला अशी संधी मिळाली तर मला नक्कीच आनंद होईल. मला काहीतरी वेगळं करायला आवडेल कारण मिमिमुळे मला एक अशी संधी मिळाली, कारण जेव्हा या चित्रपटासाठी मला विचारण्यात आले तेव्हा त्या चित्रपटानं मला आत्मविश्वास दिला, त्यामुळे या चित्रपटासाठी मेहनत घेण्यासाठी मी प्रेरित झाले. 

हेही वाचा : ‘ते स्वत:च्या मनानं वागायचे, 20 वर्षांपासून…’; वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच गश्मीरनं केलं वक्तव्य

करण जोहरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटले की ‘योग्य/ अयोग्य सोडल्यास, आता या चॅट शोला पाहण्यास आता जास्त मज्जा येईल. करण कशा प्रकारे आपल्या मुलीचा उल्लेख करत दुसऱ्या मुलींना चिडवण्याचा प्रयत्न करतो.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास असतं.’

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here